भाजपा-एमआयएम दोस्ती...कराडांना निवडून आणण्यासाठी जलिलांना उभे करावेच लागेल- रावसाहेब दानवे

भाजपा-एमआयएम दोस्ती...कराडांना निवडून आणण्यासाठी जलिलांना उभे करावेच लागेल- रावसाहेब दानवे
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका चुरशीच्या होणार आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत यावे यासाठी देशातील प्रत्येक मतदारसंघात भाजपाच्या जोर बैठका सुरू आहेत. विरोधी पक्षांनी पण आपली मोट बांधायला सुरु केले आहे. इंडिया आघाडीला देशभरात तर राज्यात महाविकास आघाडी जनतेमध्ये जाऊन जनमत आपल्या बाजूने तयार करत आहे. भाजपा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. मोदी सरकार पुन्हा बनेल असे मोठे वक्तव्य केंद्रीय रेल्वे, कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची यादी वाढत असल्याचा प्रश्न विचारला गेला ते म्हणाले केंद्रीय समिती निर्णय घेईल कोण भाजपाचा उमेदवार असेल. दिशाच्या बैठकीच्या निमित्ताने विरोधी पक्षाची चोखपणे बाजू मांडणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल व दानवे समोरा समोर आले व दोस्ताना उघड झाला. रावसाहेब दानवे हसत हसत म्हणाले इम्तियाज जलिल यांच्यासोबत माझी मैत्री आहे लोकसभेत आम्ही सहकारी आहोत पण आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ.भागवत कराड यांना निवडून आणण्यासाठी इम्तियाज जलिल यांना उभे करावेच लागेल यावेळी हशा पिकला. नेहमी विनोद करणारे दानवे आज मूडमध्ये होते. इम्तियाज जलिल व दानवेंची पत्रकार परिषदेत जुगलबंदी पहायला मिळाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाला वाटत आहे आपल्या पक्षाच्या नेत्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. भाजपाकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी तयारीही सुरू केली आहे. कराड इच्छुक असल्याचे दानवेंनी मान्य केले. मतदार संघात त्यांचे दौरे वाढले आहे. शिंदे गटाकडून पालकमंत्री संदीपान भुमरे इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार असेल निवडणुका जसजशा जवळ येतील इच्छुक व मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत याचा फायदा निवडणुकीत पुन्हा इम्तियाज जलिल यांना मिळून पुन्हा खासदार पदाची लाॅटरी लागती की काय असेही राजकीय जानकारांना वाटत आहे. कारण जलिल हे उच्चशिक्षित असल्याने लोकसभेत जनतेच्या प्रश्नांची मांडणी चांगल्याप्रकारे करत असल्याचे जिल्ह्यातील जनता बघत आहे. शेतकरी, कष्टकरी , आदर्श घोटाळ्यात न्याय मिळवून देण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. मी पुन्हा येईल म्हणणा-यांना कितपत यश मिळते हा येणारा काळच ठरवेल. एमआयएमचे विरोधक नेहमी आरोप लावतात एमआयएम हि भाजपाची बी टिम आहे. त्यांना तर दानवेंच्या या वक्तव्याने टिकेची संधी मिळेल अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
What's Your Reaction?






