रोशन गेट वर धडक कारवाई मग एमजीएम रोडवर कारवाई कधी...?

 0
रोशन गेट वर धडक कारवाई मग एमजीएम रोडवर कारवाई कधी...?

रोशन गेटवर धडक कारवाई, मग एमजीएम रोडवर कारवाई कधी...? रुग्णालयासमोरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) -छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम रुग्णालया समोर चहाचे ठेले, हातगाड्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. या प्रकारामुळे पादचारी आणि वाहनचालकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

सध्या शहरात रस्ते रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. रोशन गेट ते चंपा चौक परिसरात झालेल्या कारवाईनंतर आता सेंटर नाका ते एमजीएम रुग्णालय रोडवरील अतिक्रमणावर कारवाई कधी होणार...? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या रुग्णालय परिसरात विविध रुग्णालये असल्याने या मार्गावर रुग्णवाहिकांची आणि रुग्णांना घेऊन येणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या, हातगाड्या आणि ठेल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यास प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

रोशन गेट परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई होऊ शकते, तर या रस्त्यावर नियमांनुसार कारवाई का होऊ नये...? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई समान पद्धतीने व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

आता महानगरपालिका प्रशासन एमजीएम समोरील रस्ता आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी पावले कधी उचलणार ...? रुग्णवाहिका, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार का...? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांची मागणी : सेंटल नाका ते MGM हॉस्पिटल रोडवरील अतिक्रमणाची पाहणी करून नियमांनुसार तातडीने कारवाई करावी आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे...!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow