एसआयआर प्रक्रीयेच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट, आंदोलन केले तीव्र

 0
एसआयआर प्रक्रीयेच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट, आंदोलन केले तीव्र

SIR प्रक्रियेच्या निषेधार्थ INDIA (इंडिया) आघाडी छत्रपती संभाजीनगर चे जोरदार आंदोलन, निदर्शने. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन....

विरोधी पक्षनेते आणि जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर झालेला हा हल्ला म्हणजे स्वतः भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आजचा दिवस “भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस” म्हणून साजरा....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)-विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत तसेच मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत इंडिया आघाडी, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, उभाठाचे बाळासाहेब थोरात, पांडुरंग तांगडे पाटील, ख्वाजा शारफुद्दिन मुल्ला, कॉम्रेड अँड. अभय टाकसाळ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी जी.सी. गौडा यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, मतदार याद्या या मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा मूलभूत आधार आहेत. SIR प्रक्रियेत नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, मतदार याद्यांचे संगणकीकरण आणि माहितीचे केंद्रीकरण याबाबत इंडिया आघाडीने आक्षेप नोंदविले आहेत. पात्र मतदाराचे नाव कोणत्याही चुकीच्या प्रक्रियेमुळे वगळले जाऊ नये तसेच अपात्र किंवा दुबार नोंदी वगळताना संबंधित मतदाराला योग्य संधी आणि पारदर्शक पडताळणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

पश्चिम बंगाल व बिहारमधील मतदार याद्यांशी संबंधित घडामोडी तसेच महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंख्येतील बदलांचा संदर्भ देत मतदार यादीतील बदलांची सखोल आणि निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतही लोकसभेतील विरोधी पक्षनेते प्रश्न उपस्थित केले असून SIR प्रक्रियेतील निर्णय, मतदारांच्या नोंदींमध्ये होणारे बदल आणि निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीतील केंद्रीकरण याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही प्रक्रियेची विश्वासार्हता टिकविण्यासाठी मतदार यादीची अचूकता, पारदर्शक पडताळणी आणि हरकतींचे योग्य निराकरण आवश्यक आहे,’ अशी भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

या आंदोलनात कमाल फारुकी, नामदेवराव पवार, प्रकाश मुगदिया, अनिल पटेल, इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, नवीन ओबेरॉय, शेख महेबुब, प्रशांत जगताप, जुबेर मोतीवाला, वीणा खरे, छाया जंगले, गुलाब पटेल, राहुल सावंत, रामभाऊ लोखंडे, राजेश मुंढे, सय्यद अफजल, मोहम्मद जाकेर, ऋषिकेश महाजन, अस्मत खान, दिपालीताई मिसाळ, सागर नागरे, योगेश थोरात, मोईन कुरेशी, असदउल्ला शकील, गाजी सलाउद्दीन, महेंद्र रमंडवाल, दुर्गेश वैद्य, शेख अब्दुल रईस, मुकेश सोनवणे, अनिताताई भंडारी, निमेश पटेल, इक्बालसिंग गिल, राहुल संत, कैसर बाबा, मंजू लोखंडे, अब्दुल रऊफ, विकास गायकवाड, कॉम्रेड अमोल सरोदे, भीमराव बनसोड कॉम्रेड गोपाल बकवाल कॉम्रेड शेख शकील कॉम्रेड शेख अमजद शेख पाशु कॉम्रेड संतोष काळे, कॉम्रेड राजू हिवराळे, कॉम्रेड अनिता हिवराळे, शेख एजाज, समाधान पारधे, कॉम्रेड अनंता कऱ्हाळे कॉम्रेड सम्यक जमधडे कॉम्रेड मधुकर गायकवाड कॉम्रेड गयाबाई कॉम्रेड संजय तावरे कॉम्रेड नरसिंह कोकाटे, मुझफ्फर खान, मुनीर पटेल, सूर्यकांत गरड,अफजल खान, सरताज पठाण, हसीनबानो पटेल, सरोज जेकब, पप्पू ठुबे, अल्ताफ पटेल, सुरेश पवार,संजय औताडे,नदीम सौदागर, साजिद कुरैशी, रमेश सोनटक्के यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow