ज्यांच्याकडे पुरावा,वंशवाळ ते कुणबी पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचे काय - डॉ.राजेंद्र दाते पाटील
राज्य स्तरीय मंथन परिषद...
ज्यांचे कडे पुरावा- वंशावळ ते कुणबी पण ज्यांचे कडे काहीच नाही त्यांचे काय?राजेंद्र दाते पाटील यांचा सवाल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) छत्रपती संभाजीनगर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य स्तरीय
मराठा आरक्षण कायदेशीर व घटनात्मक मंथन परिषदेचे आयोजन रिगल लॉन, देवळाई चौक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले. परिषदेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन मातृशक्ती महिलांचे हस्ते करण्यात आले.
या परिषदेत मुख्य बीज भाषण करतांना ज्यांचे कडे पुरावा आहे, ते कुणबी म्हणुन प्रमाणपत्र काढु शकतील त्याला पडताळणी करून घेऊ शकतील परंतु ज्यांची वंशावळ जुडत नाही काही पुरावा नाही त्यांचे काय...? असा जळजळीत सवाल उच्च न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ते व जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी उपस्थित केला.
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरण देश भरातील सर्वोच्च न्यायालये घटनापीठाचे 123 पेक्षा जास्त असे विविध न्याय निवाडे आरक्षणासाठी कसे घातक आहेत हे त्यांनी उपस्थिता समोर सादरीकरण करून भूमिका स्पष्ट करून 55 पेक्षा अधिकचेपाचं, सात, नऊ, अकरा व अगदी तेरा न्यायमूर्ती असलेल्या घटना पीठचे व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे जे कि कुणबी आरक्षण आणि एसईबीसी आरक्षणा बाबत तरतूद करणारे ठरू शकतील याचे देशातील पाहिले वाहिले पी पी टी सादरीकरण त्यांनी केले असुन या सुधारीत सादरी कारणाचे निरीक्षण मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांचे सह शासनाच्या कायदा विभाग इतर विभागाने करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे...
पुढे ते म्हणाले कि, ओबीसी सारख्या सर्व सवलती " केजी ते पीजी " स्तरा पर्यंत देणारे सुधारीत शासनादेश तथा जी आर तात्काळ काढावा, प्रलंबित नियुक्त्या, आंदोलकवरील गुन्हे वापस घेणे,शहीद स्व.काकासाहेब शिंदे यांचे नावाने शहीद स्मारक करणे, सारथी साठी सर्वच प्रलंबित देयके संशोधकांना आदा करणे, स्व आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्यासाठी निधी देणे आदी मागण्या त्यांनी सविस्तर पणे मांडल्या.
रमेश केरे व जावळे काय म्हणाले...?
रनेश केरे या प्रसंगी बोलतांना म्हणाले कि, शास्वत आरक्षण मिळण्यासाठी असणाऱ्या तरतुदीवर व्यापक चर्चा या मंथन परिषदेत झाली असुन
येत्या डिसेंबरपासून तुळजापूर येथून जागरण गोंधळ करून मराठा आरक्षण जनजागरण यात्रा काढण्याच्या मानस त्यांनी जाहीर केला.
अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे म्हणाले कि,मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने नेमलेल्या समित्या व आयोग यांच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल व फसवणूककरण्यात आली आहे,त्यामुळे मराठा आरक्षणा बाबत समाजा मध्ये जनजागरण करण्या साठी यात्राकाढण्यात येणार आहे. हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली सुद्धा फसवणूक झाली असुन हैदराबाद गॅझेट, ईसीबीसी आरक्षण देण्याच्या घोषणा सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. हैदराबाद गॅझेटच्या नावा खाली समाजाची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप रमेश केरे आणि नानासाहेब जावळे यांनी केला. मराठवाड्यातील अभ्यासकांची मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासनही शासनाने पुर्ण केले नसुन न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ते व जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांचे सुधारीत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांनी पाहण्यासाठी तात्काळ वेळ निश्चित करावा, 58 लाख नोंदी सापडल्याचा दावाही सरकारने केला आहे,मात्र या नोंदी राज्यभरातील आहेत की मराठवाड्यातील हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मात्र या नोंदी राज्यभरातील आहेत की मराठवाड्यातील हे सरकारने स्पष्ट करावे.
छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण बोलतांना म्हणाले कि, मराठवाड्या तील मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण सरकारने परत देऊन अनुशेष भरावा कारण मराठवाडा हा महाराष्ट्रात येण्या पूर्वी हैदराबाद स्टेट चा भाग होता. भाषा प्रांत रचनेत मराठी भाषेचा मराठवाडा भाग 1 मे 1960 ला महाराष्ट्रात विलीन झाला. महाराष्ट्रात येण्यापूर्वी मराठवाड्यातील मराठा समाज ओ.बी.सी. मध्ये होता. महाराष्ट्र सरकारने हैदराबाद स्टेट मधून आलेले एस.सी./ एस.टी.व ओ.बी.सी. यांना महाराष्ट्र सरकारने त्या त्या प्रवर्गात समावेश केला आहे. फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओ.बी.सी. समावेश केला नाही. म्हणून मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाच्या हक्काचे ओ.बी.सी.मध्ये समावेश करून अनुशेष सुद्धा भरून काढावा 14 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रिमंडळ उपसमिती चे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व सर्व सदस्य यांनी मुंबई येथे बैठक घेतली होती. मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न वेगळा असून लवकरच मुंबई येथे मराठवाड्या तील मराठा आरक्षणा विषयी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल अशी जाहीर केले होते. ती बैठक सरकारने लवकरात लवकर घ्यावी.
परिषदेत आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील, नाशिकचे विलास पांगरकर, किशोर चव्हाण, मराठा सेवा संघांचे प्रा. शिवानंद भानुसे, धुळेचे लक्ष्मणबापु सिरसाट, भीमराव मराठे, बुलढाणाचे प्रदीप बिल्लोरे, गणेशकदम, योगेश केवारे, बीड गणेश कदम, टीम मुंबईचे रामचंद्र शेडगे, अनिल सुर्वे, सुशील निकम, सूर्याजी सोनवले, नवी मुंबईचे किरण सोनवले, ठाणेचे दीपक गायकवाड,छावा संघटनेचे सुशील पाटील पायाळ, सातारचे पांडुरंग रोडे. नांदेडचे बाळासाहेब इंगळे, जालनाचे शरद देशमुख,पुणे येथील संतोष दळवी, आर्यन पाटील,हरिष शिंदे,संस्कार सामनकर, प्रथमेश झांजे पाटील आदींसह राज्यभरातील पदाधिकारी व समाज बांधवव भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अ. भा. मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रा गोपाल चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार राहुल पाटील यांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?