शहरातील रस्त्यांवरील पोल शिफ्टींग व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा - अनिल मकरिये

 0
शहरातील रस्त्यांवरील पोल शिफ्टींग व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा - अनिल मकरिये

शहरातील रस्त्यांवरील पोल शिफ्टिंग व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा – स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आज महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचा आढावा घेत शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यांवरील सर्व विद्युत पोल तातडीने स्थलांतरित (पोल शिफ्टिंग) करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील पैठण गेट ते गुलामंडी तसेच सतीश मोटर्स ते महात्मा फुले चौक आणि महात्मा फुले चौक ते शाहू महाराज चौक या मार्गांवरील पोल शिफ्टिंगची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर नालेसफाई संदर्भात झोन क्रमांक 1 ते 10 मधील सर्व झोन अभियंत्यांची बैठक घेऊन शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ रस्त्यावर तसाच पडून राहू न देता तो तात्काळ उचलावा, तसेच नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा सुरळीत होईल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow