शाक्य नगर, भावसिंगपुरा येथे विकास योजनेतील 15 मीटर रुंद रस्त्यावरील आठ बांधकामे निष्कासित
शाक्य नगर, भावसिंगपुरा येथे विकास योजनेतील 15 मीटर रुंद रस्त्यावरील आठ बांधकामे निष्कासित...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे यांच्या आदेशानुसार सर्वे क्रमांक 32/2, शाक्य नगर, भावसिंगपुरा येथील विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित 15 मीटर रुंद रस्त्याच्या बाधित क्षेत्रातील एकूण आठ बांधकामे आज निष्कासित करण्यात आली.
सदर बांधकामधारकांना यापूर्वीच महानगरपालिकेमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर नियमानुसार ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष
वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त (झोन क्रमांक 1) लता पुजारी, सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) संजय सुरडकर, इमारत निरीक्षक सुंदर खरात, रवींद्र देसाई, शंकर दोडके, अशोक कदम तसेच नागरी मित्र पथक आणि संपूर्ण अतिक्रमण हटाव पथक उपस्थित होते.
विकास योजनेतील रस्ते मोकळे करून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने करण्यात येत आ
हे.
What's Your Reaction?