गुंठेवारी भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी फाटके कपडे घालून अनोखे आंदोलन सुरू...
गुंठेवारीची मुदत वाढवण्यासाठी फाटके कपडे घालून आमरण उपोषणाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- गुंठेवारी भरण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दोन दिवस शिल्लक असल्याने पैशासाठी संबंधित मालमत्ता धारकांची धावपळ सुरू आहे. कोणी कर्ज काढून तर कोणी उधार पैसे घेऊन तर कोणी सोने तारण ठेवून गुंठेवारीचे चालान बँकेत भरण्यासाठी गर्दी करत आहे अशी परिस्थिती दुष्काळात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्ष हि मुदत वाढवत नसल्याने शहरातील एका नागरिकाने चक्क महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फाटके कपडे घालून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. अमान विश्व मददगार संघ समितीचे संस्थापक कलिम सलिम पटेल यांनी गुरुवारी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची अशी मागणी आहे गुंठेवारी भरण्यासाठी शहरातील नागरिक आपली मालमत्ता नियमित करुन घेण्यासाठी तयार आहे परंतु राज्यात कोरडा दुष्काळ पडल्याने आर्थिक परिस्थिती हालाखिची झाली आहे. व्यवसाय ठप्प झाले आणि महागाई व हाताला काम नसल्याने गुंठेवारी भरण्यासाठी दोन महीन्याची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या उपोषणाला गुंठेवारी भागातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा व प्रशासनावर दबाव आणावा असे आवाहन केले आहे. आता बघावे लागेल की या उपोषणाची दखल घेत प्रशासन मुदतवाढ देईल किंवा नाही
.
What's Your Reaction?