चितेगाव जवळ पाण्याची जलवाहिनी फुटल्याने एक दिवस उशिरा नळाला पाणी...!

 0
चितेगाव जवळ पाण्याची जलवाहिनी फुटल्याने एक दिवस उशिरा नळाला पाणी...!

चितेगांव येथे जलवाहिनी फुटल्याने एक दिवस उशिरा नळाला पाणी...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - बीजी अप्लायन्सेस कंपनी पैठण रोड चितेगाव येथे आज संध्याकाळी 6.10 वाजता 1219 मी मी व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व पाईप मधून अचानक गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्वरित फारोळा येथून पंपिंग बंद करण्यात आलेली असून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे. तथापि जलवाहिनीवरील पाण्याचा दाब व पाण्याचा निचरा करण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सदरील दुरुस्तीचे काम सकाळी पूर्ण होईल. यादरम्यान 700 मीमी व 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनी द्वारे येणारे पाणी सिडको एक्सप्रेस जलवाहिनीद्वारे सिडको एन-5 येथे वळविण्यात आलेले आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहर परिसराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात येईल. अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow