जेष्ठ समाजसेवक हाजी जब्बार बागवान यांचे दु:खद निधन, आज सायंकाळी पिंपरी राजा येथे दफनविधी...

 0
जेष्ठ समाजसेवक हाजी जब्बार बागवान यांचे दु:खद निधन, आज सायंकाळी पिंपरी राजा येथे दफनविधी...

ज्येष्ठ समाजसेवक हाजी जब्बार बागवान यांचे दुःखद निधन; आज सायंकाळी पिंपरी राजा येथे दफनविधी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 15 (डि-24 न्यूज) : सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक हाजी जब्बार हाजी गौस मोहम्मद बागवान (वय 75) यांचे आज (रविवारी) दुपारी एशियन हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने छत्रपती संभाजीनगर शहरासह त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.

हाजी जब्बार बागवान यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील सर्व स्तरांतील गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी समर्पित केले होते. धार्मिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. जामा मस्जिद येथील मजलिस-ए- आमेला जामीया इस्लामिया काशिफूल उलूम मदरसाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ते बागवान एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्रचे अध्यक्ष होते.

या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आयुष्यभर आर्थिक व शैक्षणिक मदत केली. समाजातील गरजू लोकांना आधार देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि धार्मिक-सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती.

सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने समाजाने एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

त्यांची नमाज-ए-जनाजा व दफनविधी आज, रविवारी सायंकाळी बाद नमाज मगरीब त्यांच्या पैतृक गावी पिंपरी राजा येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow