घाटी रुग्णालयात ब्रेन ट्युमयची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल मुतवल्ली विंगने डॉक्टरांचा केला सत्कार...!

 0
घाटी रुग्णालयात ब्रेन ट्युमयची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल मुतवल्ली विंगने डॉक्टरांचा केला सत्कार...!

घाटी रुग्णालयात ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल मुतवल्ली विंग तर्फे डॉक्टरांचा भव्य सत्कार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- ऑल इंडिया उल्मा बोर्ड मुतवली विंग तर्फे आज घाटी रुग्णालय सुपर स्पेशालिस्ट न्यूरो सर्जरी इमारतीच्या ओपीडी संपर्क कार्यालयात न्यूरोसर्जन विभाग प्रमुख डॉ. सचिन गुठे यांनी गोरगरिबांना चांगल्या प्रकारचे उपचार करून कार्य केल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन मुतवली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मुजावर यांनी सन्मानित केले. 

यावेळी औरंगाबाद येथील शहाबाजार रहिवाशी रुग्ण शेख मोहम्मद अब्दुल कादर वय 51 यांनी आपल्या नातेवाईक मित्र परिवारासह मेंदूची अवघड शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे केल्यामुळे न्यूरोसर्जन सर्व डॉक्टरांचे आभार मानले. मोहम्मदची पत्नी रुबीना शेख आणि मुलगा अबू सुफियान यांनी सुपर स्पेशालिटी इमारत न्यूरोसर्जन विभागाचे डॉ. सचिन गुठे 

प्राध्यापक व विभागप्रमुख, 

डॉ. भावना टाकळकर 

सहयोगी प्राध्यापक, 

डॉ. सैफ हमीद 

सहाय्यक प्राध्यापक, 

डॉ. विजय मुंढे 

सहाय्यक प्राध्यापक, 

 डॉ. कृतिका गर्ग 

सहाय्यक प्राध्यापक, 

डॉ. मनोज भुक्तर 

वरिष्ठ निवासी डॉक्टर, 

डॉ. प्रणव पिसे , 

कनिष्ठ निवासी डॉक्टर, 

डॉ. मनीष वैद्य 

हाऊस ऑफिसर, आणि आयुष्यमान योजनेचे शेख अफरोज डाटा एन्ट्री ऑपरेटर या सर्व मान्यवरांचा सत्कार करून रुबीना शेखचे नातेवाईक सलमा बेगम, रेहाना बेगम, शेख नाहीया, शेख अबू, सुफियान सय्यद, नाजनीन शेख मोबीन यांनी आभार मानले. 

यावेळी डॉक्टर सचिन गुठे सांगितले की संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांना आवाहन केले की घाटी रुग्णालयात अनेक वर्षापासून मेंदूवरील शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर आणि उपलब्ध नव्हते त्याचप्रमाणे ही सुविधा चालू करण्यासाठी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि विभागाचे ओएसडी डॉक्टर सुधीर चौधरी यांचा मोलाचा वाटा असून गरीब रुग्णांना अल्प दरात उपचार करण्याची संधी अमलात आणून अंमलबजावणी करण्यात आली आता बऱ्याच मेंदू शस्त्रक्रिया करणे रुग्णालयात शक्य झाले असून तज्ञ डॉक्टर 24 तास उपलब्ध असून सर्व रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे सांगितले.

यावेळी उलमा बोर्ड मुतवल्ली विंगचे महिला जिल्हाध्यक्ष फरजाना शहा, शहर महिला उपाध्यक्ष सईदा आपा, सूफी संत विंगचे सुमन जाधव यांच्यासह मोठ्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow