मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला हर्सुल पोलिसांनी केले जेरबंद, 1.60 लाखांच्या चार दुचाकी जप्त...!

 0
मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला हर्सुल पोलिसांनी केले जेरबंद, 1.60 लाखांच्या चार दुचाकी जप्त...!

मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला हर्सूल पोलिसांनी केले जेरबंद; 1.60 लाखांच्या चार दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 29 (डि-24 न्यूज) :- हर्सूल परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या संशयित चोरट्याला हर्सूल पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या एकूण चार मोटारसायकली, अंदाजे 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या, जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर इसाक मोहयोद्दीन सिद्दीकी (वय 40, धंदा व्यापार, रा. बेरीबाग, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर) यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा रजि. क्र. 331/2026, कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या विशेष शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी मोहम्मद नबील उर्फ पेंदा अब्दुल सिराज (वय 27, व्यवसाय मजुरी, रा. आसिफिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल मिळून आली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) दिली. पोलीस कोठडीदरम्यान अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने बाबा पेट्रोलपंप व हर्सूल गावातून दोन मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्याने या दुचाकी सावंगी तलावाच्या भिंतीलगत एका खड्ड्यात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या माहितीवरून आणखी दोन मोटारसायकली जप्त केल्या.

दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता एमएच 20 एचएफ 4546 ही होंडा शाईन मोटारसायकल आणि एमएच 20 डीएम 1445 ही मोपेड अ‍ॅक्टिव्हा यासह एकूण चार मोटारसायकली जप्त करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

यापैकी एका मोटारसायकल चोरीप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 302/2026, कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणातील फिर्यादी रामदास भाऊसाहेब म्हस्के (वय 29, व्यवसाय हार्डवेअर दुकान, रा. मुर्शीदाबाद, शेंदुरवादा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले (परिमंडळ-2) आणि सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे (सिडको विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक स्वाती केदार (हर्सूल पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक रफीक शेख, पोलीस कर्मचारी क्रमांक 2736 सुभाष शेवाळे, पोलीस कर्मचारी क्रमांक 2509 ठाकणे, पोलीस कर्मचारी क्रमांक 2466 फिरोज तडवी, पोलीस कर्मचारी क्रमांक 3207 आकाश जायभाये आणि पोलीस कर्मचारी क्रमांक 1861 मोहन सिंगल यांचा समावेश होता.

हर्सूल पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow