आमखास मैदानावर फॅमिली फेस्टचे शानदार उद्घाटन...!
आमखास मैदानावर फॅमिली फेस्टचे शानदार उद्घाटन...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) आज संध्याकाळी ऐतिहासिक आमखास मैदानावर फॅमिली फेस्टचे शानदार उद्घाटन जेष्ठ संपादक शोएब खुसरो यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक अफसरखान, माजी नगरसेवक अयूब खान, सत्तार खान, जावेद पटेल, मुजीब खान, राहिल सिद्दीकी, मुबश्शिर सिद्दीकी, अजहरोद्दीन, सलिम अहेमद, वाहेद सिद्दीकी, खतिब अन्सारी, शेख नसीर, शेख खलील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या फॅमिली फेस्टमध्ये कुटुंबासह भेट द्यावी येथे मुलांसाठी खेळ, शैक्षणिक गैदरींग, खवैय्यांसाठी स्टाल्स, टु व्हिलर व घर प्लाॅट खरेदीसाठी स्टाॅल्स, कपड्यांची स्टाॅल्स लावले आहेत. दुपारी 12 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत हे फॅमिली फेस्ट सुरू राहणार आहे. येथे एकदा तरी शहरवासीयांनी कुटुंबासह भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे
.
What's Your Reaction?