चिकलठाणा एमआयडीसीत संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या आईस्क्रीमचा साठा जप्त, एफडीएच्या कारवाईने खळबळ...

 0
चिकलठाणा एमआयडीसीत संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या आईस्क्रीमचा साठा जप्त, एफडीएच्या कारवाईने खळबळ...

संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या आईस्क्रीमचा साठा जप्त; FDA ची एमआयडीसी चिकलठाणा येथे धडक कारवाई...

आयुक्त तुकाराम मुंढें एक्शन मोड मध्ये , राज्यात मोठ्या प्रमाणात छापेमारीने खळबळ 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज ) – अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा व गुणवत्ता तपासणी मोहिमेअंतर्गत एमआयडीसी चिखलठाणा परिसरात मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या आईस्क्रीमचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण 187.6 किलो आईस्क्रीम जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ₹43 हजार 148 इतकी आहे.

 

FDA च्या पथकाने एमआयडीसी चिखलठाणा येथील प्लॉट क्रमांक E-16/01/03 वरील एम/एस राज महल आईस्क्रीम या गोडाऊनची तपासणी केली. साठवण्यात आलेल्या आईस्क्रीमच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान ‘शाही गुलाब’ फ्लेवरचे 98.8 किलो आईस्क्रीम (किंमत ₹22,724) तसेच ‘मँगो’ फ्लेवरचे 88.8 किलो आईस्क्रीम (किंमत ₹20,424) जप्त करण्यात आले. एकूण 187.6 किलो आईस्क्रीमचा साठा FDA ने ताब्यात घेतला.

या प्रकरणात नरेशकुमार मदनलाल जाट (वय 35 वर्षे) यांचे नाव समोर आले आहे. जप्त केलेल्या आईस्क्रीमबाबत भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून अन्न सुरक्षा नियमांनुसार तात्काळ कारवाई करण्यात आली.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

जप्त केलेल्या आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती FDA प्रशासनाने दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow