काँग्रेसचे मत चोरी विरोधात स्वाक्षरी अभियान सुरू...

 0
काँग्रेसचे मत चोरी विरोधात स्वाक्षरी अभियान सुरू...

शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे रेल्वे स्थानकावर "मत चोरी विरोधात" भव्य स्वाक्षरी मोहीम...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकावर "वोट चोरी विरोधी स्वाक्षरी मोहीम" आयोजित करण्यात आली होती. ज्यात सर्वसामान्य नागरिकांतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. 

“वोट चोरीविरोधी स्वाक्षरी मोहीम” म्हणजे मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी घेतलेली जनजागृती मोहीम आहे. असे मत शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी व्यक्त केले.

ही मोहीम प्रामुख्याने काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे, निवडणुकांमध्ये मतमोजणी प्रक्रियेवर, ईव्हीएमच्या वापरावर व निकालावर पक्षांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. जर मत चोरी झाली, म्हणजे मतदाराने दिलेला खरा मतदान परिणाम बदलला, तर लोकशाही धोक्यात येते.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि निष्पक्ष राहावी यासाठी नागरिकांचा पाठिंबा मिळवणे. केंद्र सरकार व निवडणूक आयोगाकडे पारदर्शकतेसाठी मागणी पोहोचवणे.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश पदाधिकारी डॉ. जफर खान, डॉ. सरताज पठाण, अशोक डोळस, गट नेता भाऊसाहेब जगताप, इक्बालसिंग गिल, उमाकांत खोतकर, जयप्रकाश नन्नावरे, शेख कैसर बाबा, अनिस पटेल, महेंद्र रमंडवाल, साहेबराव बनकर, इंजि.इफ्तेकार शेख, शेख अथर, संगठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, आमेर अब्दुल सलीम, गौरव जैस्वाल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, इंजि. मोहसिन खान, संजय धर्मरक्षक, शेख मोहसिन, सय्यद फय्याजोद्दीन, राहुल सावंत, जाफर खान अनिता भंडारी, उषा खंडागळे, शकुंतला साबळे, रेहाना शेख, सबिया बाजी, सय्यद जाकीर, अतिश पागोरे, सुनील साळवे, मजाज खान, शफीक शहा, जमील शेख, शेख अफसर, फराज अबेदी, आकाश रगडे, मुद्दसिर अन्सारी, नदीम सौदागर, राजू रमंडवाल, साजिद कुरैशी, सलमान खान, अस्मत खान, सलीम पटेल, इरफान खान यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow