नवीन मतदार नोंदणी सुरु, राजकीय पक्षांकडून नोंदणी अर्ज एकगठ्ठा घेतले जाणार नाही- उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके
नवीन मतदार नोंदणी सुरु, राजकीय पक्षांकडून नोंदणी अर्ज एकगठ्ठा घेतले जाणार नाही- उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.26(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून निवडणूक आयोगाने मतदार यादीची पुशरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नवीन मतदारांची नोंदणी, स्थलांतर, छायाचित्र अन्य कामे बिएलओ करणार आहे. 25 जूलैला प्रारुप यादी तर 20 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. राजकीय पक्षांकडून एकगठ्ठा मतदार नोंदणीचे अर्ज स्विकारले जाणार नाही. यासाठी राजकीय पक्षांच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांना बीएलए(Booth leval Agent) नियुक्त करावा लागणार आहे. हा एजंट बीएलओ(Booth leval officer) च्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. बीएलएच्या मदतीने मतदार याद्यांची दुरुस्ती व अद्ययावत करण्याचे काम केले जाणार आहे. मात्र हा व्यक्ती त्याच वोटींग बुथचा रहीवासी असावा. शासकीय कर्मचारी नसावा. बीएलओकडे दररोज दहा अर्ज बीएलए देवू शकतो. एकगठ्ठा मतदार नोंदणी अर्ज स्विकारले जाणार नाही. जिल्हाध्यक्षांना मतदार यादी बीएलए मार्फत दिले जाणार आहे. नोंदणी प्रक्रीयेत राजकीय पक्षांना सहभाग घ्यायचा असेल तर बीएलए नियुक्त करावे लागेल. अशी माहिती निवडणुक विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
25 जूनपासून मतदार यादीचे पुनरिक्षणाला सुरुवात केली आहे. दोन टप्प्यांत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कामकाज होणार आहे. बीएलओ मार्फत मतदार यादीतील नावातील दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, अस्पष्ट छायाचित्रे अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. 25 जूलै रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 25 ते 9 ऑगस्ट या कालावधीत दावे व हरकती स्विकारले जाणार आहे. एखाद्याच्या नावावर आक्षेप घेणे, दुरुस्ती, फोटो दुरुस्तीचे काम बीएलओ मार्फत केले जाणार आहे. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींचा निपटारा 19 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या मतदार केंद्रावर 1500 पेक्षा अधिक मतदान आहे त्या ठिकाणच्या केंद्राची पुनर्रचना होणार आहे. दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर मतदान करण्यासाठी जावे लागू नये यासाठी सोसायटीत सुध्दा मतदान केंद्र दिले जाणार आहे. अशी माहिती कटकेंनी दिली.
What's Your Reaction?