शहरातील या भागात उद्या विजपुरवठा 12 तास बंद राहणार...!
या भागात उद्या 12 तास वीजपुरवठा बंद राहणार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- महावितरणच्या 33 केव्ही बायजीपुरा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामासाठी उद्या,शनिवारी 4 एप्रिल सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. या 12 तासांच्या वीज कपातीमुळे शहरातील दाट वस्तीच्या आणि व्यापारी परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे.
या कामामुळे बायजीपुरा 33 केव्ही उपकेंद्राशी संबंधित सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिन्सी परिसर, रोशनगेट, शहाबाजार, जुना बाजारचा काही भाग, शहागंज, बांबू मार्केट, जाफरगेट, जुना मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा आणि संजयनगर या परिसरांचा समावेश आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवल्यामुळे भविष्यात कमी दाबाची समस्या दूर होईल आणि वीजपुरवठा अधिक सुरळीत होईल. दुरुस्तीचे काम नियोजित वेळेआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जाणार आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास विलंब झाल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?