"कर से आजादी" व "कर से मुक्ति" " शास्ती माफीची मनपाची योजना जाहिर...

"कर से आजादी" व "कर से मुक्ति"
"शास्ती माफीची" योजना जाहीर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.8(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षात आज पर्यंत 62.56 कोटी मालमत्ता कराची वसुली झाली असून 63,781 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला आहे.महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची-ड, प्रकरण-आठ कराधान नियमावलीतील कलम-51 नुसार थकीत मालमत्ता करावर 2% दराने शास्ती आकारण्यात येते. आकारण्यात आलेली शास्ती पुर्णतः किंवा अंशतः माफ करण्याचे आयुक्तांना स्वेच्छाधिकार आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिन व मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील निवासी मालमत्तांच्या करावर आकारलेली शास्ती माफीचा निर्णय घेतला आहे. सदर शास्तीमाफीची ही योजना पुढील प्रमाणे लागू राहील.
01. "शास्तीची आजादी
दिनांक 15 जुलै 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत निवासी मालमत्तांवरील पूर्ण थकबाकी एकरकमी भरणा केल्यास सर्व निवासी मालमत्ताधारकांना मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये एकूणात 95% सवलत देण्यात येणार आहे.
02. "शास्तीची मुक्ति"
दिनांक 16 ऑगस्ट 2025 ते 17 सप्टेंबर 2025 या कालावधीत निवासी मालमत्तांवरील पूर्ण थकबाकी एकरकमी भरणा केल्यास, सर्व निवासी मालमत्ताधारकांना मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये 75% सवलत देण्यात येणार आहे.तरी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व मालमत्ताधारकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन महानगरपालिकेचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यांनी केले आहे.
What's Your Reaction?






