अफवांवर लक्ष देवू नका, धार्मिक स्थळाला धक्का लागणार नाही - संतोष वाहुळे

 0
अफवांवर लक्ष देवू नका, धार्मिक स्थळाला धक्का लागणार नाही -  संतोष वाहुळे

अफवांवर दक्ष देवू नका, धार्मिक स्थळाला धक्का लागणार नाही - संतोष वाहुळे

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) -

आज सकाळी दहा वाजेपासून महापालिकेच्या वतीने रेल्वेस्टेशन समोरुन अतिक्रमण हटावो मोहीम सुरु करण्यात आली. शांततेत कडक पोलिस बंदोबस्तात कार्यवाही सुरु झाली. नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी शहरातील जनतेला आवाहन केले आहे धार्मिक स्थळांना या कार्यवाईत धक्का लागणार नाही अफवांवर लक्ष विश्वास ठेवू नका, धार्मिक स्थळांचा काही भाग अतिक्रमण मध्ये येत असेल तर वेळ दिली आहे. रेल्वेस्टेशन धार्मिक स्थळाच्या मस्जिद कमेटीने समोरील अतिक्रमण काढण्यास सहकार्य केले आहे. मस्जिदची स्वसंरक्षण भिंत जर्जर झालेली आहे त्याला धक्का लागणार नाही, मिनाराही तसाच राहणार.  धार्मिक स्थळाच्या भींतीलगत अतिक्रमण काढले आहे. धार्मिक स्थळाच्या स्टरक्चरला धक्का लागणार नाही नागरीकांनी सहकार्य करावे. सोशलमिडीयावर अफवा पसरवू नये. व्यवसायिक मालमत्तांचे अतिक्रमण काढले जात आहे रेसिडेन्शियलला 15 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्विस रोड मोकळे केले जात आहे. हि कार्यवाही रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप ते एपिआय काॅर्नर पर्यंत होणार आहे. रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. असे वाहुळे यांनी सांगितले. अतिक्रमण कार्यवाईत पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक प्रविणा यादव व अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow