समृध्दीवर फाॅर्च्युनरची कंटेनरला जोरदार धडक, डॉक्टर दांपत्याचा जागीच मृत्यू...!

 0
समृध्दीवर फाॅर्च्युनरची कंटेनरला जोरदार धडक, डॉक्टर दांपत्याचा जागीच मृत्यू...!

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनरची कंटेनरला मागून धडक, डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू

सिंदखेडराजा, दि.23(डि-24 न्यूज)- समृद्धी महामार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन मुलांसह चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेल क्रमांक 326 जवळ, सिंदखेडराजा तालुक्यातील ककिगांव राजा परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली MH-20-एचएन-6768 फॉर्च्युनर गाडी डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे आपल्या कुटुंबासह प्रवास करत असताना भरधाव वेगात लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या NL-01-एडी-4981 क्रमांकाच्या कंटेनरला मागून जोरदार धडकली.

धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनर गाडी कंटेनरच्या मागील चाकांपर्यंत घुसली. अपघातात गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या दुर्दैवी अपघातात डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर (वय 52) आणि त्यांच्या पत्नी डॉ. गुलसितान बी सय्यद आसिफ (वय 45) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, डॉ. सय्यद आसिफ हे बदनापूर येथील नूर मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

या अपघातात दाम्पत्याची दोन मुले आणि वाहनचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर समृद्धी महामार्ग प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य आणि प्राथमिक उपचार मिळाले असते, तर मृतांची जीवितहानी टाळता आली असती, अशी खंत व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow