गाव तांड्यावर जात मंत्री अतुल सावे यांनी साजरी केली होळी...!

 0
गाव तांड्यावर जात मंत्री अतुल सावे यांनी साजरी केली होळी...!

गाव तांड्यावर जात मंत्री अतुल सावे यांनी केली होळी साजरी..

मंत्री श्री अतुल सावे यांनी पारंपरिक नृत्याचा घेतला आनंद..

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी गाव तांड्यावर जात बंजारा समाजातील नागरिकां समवेत होळी उत्त्सव मोठ्या आनंदात साजरा केला.

संपूर्ण देशभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध समाजाच्या वतीने देखील पारंपरिक पद्धतीने हा सण आनंदात साजरा करण्यात येतो. शनिवारी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी जटवाडा येथील गावंदरी तांडा येथील बंजारा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी बंजारा समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पारंपरिक नृत्यावर नाचत आनंद साजरा केला. 

या प्रसंगी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे यांनी बंजारा भाषेतून भाषणाची सुरुवात करत ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेशित केल्या प्रमाणे या समाजा सोबत मला होळी खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. महाराष्ट्रातील तांड्या वस्तीवरील कामासाठी आपल्या खात्याच्या वतीने जवळ पास 425 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून यातील 4700 विविध विकास कामे करण्यात आली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असल्याने त्यांनी कुठल्याच समाजाला मागे ठेवण्यात कसूर केलेली नाही. पुढच्या वेळी देखील मी बंजारा समाजा सोबत मोठ्या उत्साहात होळी खेळण्यासाठी येईल त्यापूर्वीच येथील रखडलेली कामे मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन देखील त्यांनी उपस्थित समाजातील नागरिकांना दिले.

यावेळी माजी विधान सभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, विजय औताडे, सुहास शिरसाठ, विवेक राठोड, नितीन खरात, पूनम बम्हणे, गोरख चव्हाण, अण्णा दरोडे, सरपंच डॉ वैष्णव नवनाथ शेटे, प्रदीप नलावडे, राजू पवार, पूनम चव्हाण, दादासाहेब औताडे, दिगंबर राठोड, यांच्या सह मोठ्या प्रमाणावर बंजारा समाजातील नागरिक यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow