अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणा गावातील दोन मनोरुग्ण महिलांना माणुसकीची मदत...
अजिंठा पोलीस स्टेशन हद्दितील शिवणा गावातील दोन मनोरुग्ण महिलांना माणुसकीची मदत...
एकिस येरवडा पुणे मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल.तर दुसरिस माणुसकी वृद्ध सेवालय संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले...
अजिंठा पोलीसांच्या व माणुसकी टिम च्या मदतीने दोन मनोरुग्णांन महिलांना मदत....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - मनोरुग्ण महिला नामे सुनिता कडुबा इंगळे वय 40 वर्ष दुसरी महिला वंदना सीताराम जगताप वय 35 रा. शिवणा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर या महिला गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त आहे. आई वडील वृद्ध असल्याने त्यांचा कडे लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. आजार जास्त प्रमाणात वाढल्याने सदर महिला ही हिंसक वागत असुन घरातील व्यक्तींना मारहाण करणे लोकांना शिवीगाळ करणे, सर्व सामान्यांना दगड फेकुन मारणे, मोठमोठ्याने ओरडणे, अशा पदधतीचे वर्तणुक करत आहे. त्यांचा आजार खुप मोठ्या स्वरुपात वाढलेला आहे. त्या अनुषंगाने सदर परिसरातील नागरीकांचे जिवितास मोठा धोका निर्माण झालेला असुन तिचा भाऊ व ग्रामपंचायत शिवणा यांची तक्रार प्राप्त असुन त्यात नमुद केले आहे की, आम्ही स्टाफ मार्फत तिस वारंवार जाऊन समक्ष समज दिलेली आहे. परंतु तिचे वागणुकीत काहीही फरक पडत नाही. म्हणून तिचेवर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. अशी विनंती तिचे भाऊ राजेंद्र सिताराम जगताप रा.बाबा मोरे नगर गणेष काॅलनी कल्यान यांनी पो स्टे अजिंठा ता. सिल्लोड यांनी समक्ष पो स्टे अजिंठा येथे येऊन केलेली आहे. त्यामुळे आम्ही सदर मनोरुगणाची माहीती मनोरुग्णांसाठि काम करणारे सुमित पंडीत, सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष (नोंदणी क्र. एफ022094 ए.आर.एम.) अशी असुन सदरची माहीती त्यांना दिली असता त्यांनी सदर मनोरुग्ण महिलांची खात्री केली व शासकीय वैदयकिय रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरांनी दिर्घ उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा, पुणे येथे पाठविण्याचे आदेशीत केले आहे. त्याकरीता त्यास पुढिल उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा पुणे येथे नेण्याचा सल्या डाँक्टरांनी दिल्यानंतर कायदेशीर कागदोपत्री पुर्तता करुन आज त्यास येरवडा पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु पुणे येथील डॉक्टरांनी सांगितले की एकीचा आजार जास्त प्रमाणात नाही तीला आपल्या माणुसकी सेवालयात ठेवून त्यावर उपचार घेता येईल आम्ही औषधोपचार चालू करतो जर आजार जास्तच वाढला तर 15 दिवसांनी आपले मनोरुग्णालयात घेऊन यावे असा सल्ला दिल्याने महिला नामे सुनीता कडुबा इंगळे वय 40 वर्षे हिस माणुसकी वृद्ध सेवालय येथे कागदोपत्री पुर्तता करून तात्पुरत्या नीवाऱ्यासाठि दाखल करण्यात आले. माणुसकी टिम च्या सभासदांनी मदतकार्य करुन उपचारासाठी दाखल केले. यात उपवीभागीय पोलीस अधीकारी सिल्लोड विश्वजित काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शामसुंदर कौठाळे साहेब पोलिस निरीक्षक सिल्लोड शहर, सुधिर मोटे साहेब व पवन इंगळे साहेब सहाय्यक पोलिस निरीक्षक अजिंठा, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर साहेब, भागवत शेळके साहेब, संदिप कोथलकर,
पो.हे.कॉ, शिवणा बीट व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित, के.के.जगताप,
ज्ञानेश्वर जगताप, पुजा पंडित आदिंनी मदतकार्य केले,
माणुसकी समुहाचे कार्य मनोरुग्णानसाठि लाख मोलाचे...
मनोरुग्णांच्या जवळ देखील कोणी जायला तयार होत. हे आम्ही स्वतःअनुभवले नाही ते खूप सेन्सिटिव्ह असतात कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात परंतु समाजसेवक सुमित पंडित करत असलेल्या रंजल्या गांजल्यांच्या सेवा ही खरंच वाखाडणे योग्य आहे. पोलीसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्याना हक्काचा निवारा मिळवून देतात आज प्रत्यक्ष मी अजिंठा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी चार्ज असल्याने माझ्या डोळ्यांनी त्यांना या मनोरुग्ण महिलांच्या सुरक्षेचा दृष्टीने मदत प्रसंगी समाजसेवक सुमित पंडित यांनी मोठे हिमतीने त्या कायदेशीर प्रक्रीया करुन उपचारासाठी पुणे येथे दाखल केले आहे. पोलीसांना सुमित पंडित हे रात्री बेरात्री फोन केला की नि स्वार्थ: भावनेने मदतीसाठी तयार असतात त्यांची पोलीसांना वेळोवळी मदत होत आहे.
त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार समाजात अशी खूप कमी लोक आहेत की ते दुसऱ्यासाठी जगतात..
---- सुधिर मोटे सहाय्यक पोलिस निरीक्षक
What's Your Reaction?