उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन...!
उष्णतेच्या लाटेचा इशारा; नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)-भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात येत्या १५ तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. त्यादृष्टीने उष्णता कालावधीत करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.
काय करावे-
१. पुरेसे पाणी प्या.तहान लागली नसली तरी दर अर्ध्यातासाने पाणी प्या.
२. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
३. दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडणे टाळा.
४. सुर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरात पडदे,झडपांचा वापर करा.
५. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करा.
६. हलके, पातळ, सछिद्र सुती कपडे वापरा.
७. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा.
८. उन्हात काम करीत असल्यास टोपि, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान , चहरा झाकावा.
९. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबु पाणीऊ, ताक इत्यादीचे नियमित सेवन करावे.
१०. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इ. उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
११. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या.
१२. पंखे, ओले कपडे याचा वापर करावा.थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
१३. कामाच्या ठिकाणी जवळ पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करावी.
१४. सुर्यप्रकाशाचा थेट संपर्क येणार नाही अशा ठिकाणी कामगारांनी थांबावे.
१५. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर काम असल्यास अध्ये मध्ये विश्रांती घ्यावी.
१६. गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्तिंची अधिक काळजी घ्यावी.
१७. गुरांचा छावणीत ठेवावे. त्यांना पुरेसे पाणी प्यावयास द्यावे.
१८. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या @SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक व कु ॲप वरील सुचना पहाव्या.
१९. जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सुचना पहाव्या.
(काय करू नये...?)
१. उन्हात अतिशय कष्टाची कामे करू नका.
२. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड-थंड पेये घेऊ नका.
३. दुपारी १२ ते ३ या वेळेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
४. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
५. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
६. गडद, घट्ट व जाड कपडे चालण्याचे टाळावे.
७. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
८. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या.
➤ कामगार व उद्योग क्षेत्रासाठी...
१. कामगारांचे कामाचे तास पुन्हा नियोजित करणे, विशेषतः दुपारच्या उष्णतेत काम टाळणे.
२. आवश्यकतेनुसार कामाचा वेग कमी करण्याची परवानगी देणे.
३. पुरेसे पिण्याचे पाणी, विश्रांती क्षेत्रे व थंडावा मिळेल अशी व्यवस्था करणे.
४. आपत्कालीन बर्फ पॅक व उष्णता प्रतिबंधक साहित्य उपलब्ध करून देणे.
५. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांचे नियमित आरोग्य तपासणी करणे.
➤ कारखाने व खाणी व्यवस्थापनासाठी...
१. कामगारांना सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत विश्रांती देणे.
२. दोन व्यक्तींच्या गटाने काम करण्याची व्यवस्था करणे.
३. इलेक्ट्रोलाइट पूरक पेय उपलब्ध करून देणे.
४. कामगारांना उष्णतेच्या धोका व उपाययोजनांबाबत जागरूक करणे.
➤ विशेष लक्ष देण्याचे गट...
१. बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर व असंघटित क्षेत्रातील कामगार.
२. जनजागृतीसाठी पोस्टर, बॅनर व श्रमिक चौकांवर मोहीम आयोजित करणे.
अतिरिक्त सूचना ग्रामयात्रा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी
१. उन्हाळ्यात सुरू असलेल्या ग्रामयात्रा व धार्मिक / सांस्कृतिक मिरवणुका यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आवश्यक उपचार साहित्य व उपाययोजना उपलब्ध कराव्यात.
२. प्रक्रिया व कार्यक्रमांचे वेळापत्रक उन्हाच्या उच्चांक काळात बदलण्याची शक्यता तपासावी.
३. प्रत्येक ठराविक लोकसंख्येच्या गटासाठी थंडावा मिळेल अशी विश्रांती क्षेत्रे (Cooling Areas) अनिवार्यपणे उभारावीत.
४. यात्रांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी व इलेक्ट्रोलाइट पेय उपलब्ध करून द्यावे.
५. जनजागृतीसाठी स्थानिक पातळीवर घोषणाबाजी, पत्रके व माहिती फलकांचा वापर करावा.
सर्व नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये उष्माघातापासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या शासकीय रुग्णालय / आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
➤ मदत / संपर्क कक्ष...
जिल्हाधिकारी कार्यालयः-०२४०-२३३१०७७
जिल्हा रुग्णालय (जिल्हा शल्य चिकित्सक)- ०२४०-२९९४१५५
जिल्हा आरोग्य अधिकारी-९४२१८७७५६८
वैद्यकीय महाविद्यालय- GMCH – ०२४०-२४०२४०१ / CSMC – ८९५६३०६००७
What's Your Reaction?