फाजलपूरा येथे रिक्षा स्टँडचे उद्घाटन, रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्याचे नवीन ओबेरॉय यांचे आश्वासन...

 0
फाजलपूरा येथे रिक्षा स्टँडचे उद्घाटन, रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्याचे नवीन ओबेरॉय यांचे आश्वासन...

फाजलपुऱ्यात ऑटो रिक्षा स्टँडचे उद्घाटन; रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्याचे नवीन ओबेरॉय यांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि- न्यूज)- शहरात रिक्षा चालक महासंघाच्या वतीने नवीन ऑटो रिक्षा स्टँड सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच उपक्रमांतर्गत फाजलपुरा येथील एसटी कॉलनी परिसरात मंजूर झालेल्या चौथ्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे नगरसेवक नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या हस्ते रिक्षाचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी रिक्षा चालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

शहरात 200 अधिकृत रिक्षा स्टँडची गरज

उद्घाटनप्रसंगी बोलताना नगरसेवक नवीन ओबेरॉय म्हणाले की, शहरात सध्या सुमारे 100 अधिकृत रिक्षा स्टँड असून, सुमारे 35 हजार रिक्षा शहरात धावतात. रिक्षांची संख्या लक्षात घेता शहरात किमान 200 अधिकृत रिक्षा स्टँड असणे आवश्यक आहे. ही रिक्षा चालक महासंघाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

रिक्षाचालक आणि रिक्षामालकांच्या समस्या सोडविण्यासाठी हा प्रश्न महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येईल. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन ओबेरॉय यांनी दिले.

याशिवाय, परिवहन अधिकारी आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन रिक्षाचालकांच्या विविध मागण्या व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या कार्याचा वारसा पुढे सुरू

स्वर्गीय मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी हयात असताना रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता त्यांचे सुपुत्र नवीन ओबेरॉय हे त्यांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत रिक्षा चालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी त्यांचे आभार मानले.

या उद्घाटनप्रसंगी रिक्षा स्टँडचे उपाध्यक्ष नासेर हुसेन पठाण, अली सिकंदर, नफिस भाई, जावेद भाई यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow