शहागंज येथील घटनेची सखोल चौकशी करण्याची जैस्वाल समाजाची मागणी, पोलिस आयुक्तांना निवेदन...

 0
शहागंज येथील घटनेची सखोल चौकशी करण्याची जैस्वाल समाजाची मागणी, पोलिस आयुक्तांना निवेदन...

शहागंज घटनेची चौकशीच्या मागणीसाठी जैस्वाल समाजाचे पोलिस आयुक्तांना निवेदन...

नगरसेवक ऋषीकेश जैस्वाल यांना सुरक्षा देण्याची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहागंज येथील रस्त्यावरील हातगाड्या हटवण्याची कार्यवाई सुरू असताना एका व्यक्तीने नगरसेवक ऋषीकेश जैस्वाल यांना शिविगाळ व धमकी देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सिटी चौक पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन त्या व्यक्तीला अटक केली आहे. आज जैस्वाल समाजाच्या वतीने पोलिस आयुक्त प्रविण पवार यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. 

ज्या व्यक्तीने धमकी दिली आहे त्याचा बोलता धनी कोणी आहे का...? आज धमकी दिली पुढे ऋषीकेश जैस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तर सुरक्षेची मागणी करण्यासाठी आयुक्तांना मागणी केली आहे. अगोदर सुध्दा शहागंज भागात वाद विवाद झाले आहे अशी घटना वारंवार होऊ नये यासाठी दक्षता घेण्याची मागणी केली आहे. जैस्वाल समाज कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. सर्व जाती धर्मातील लोक शहागंज येथे हातगाडीवर व्यवसाय करतात. रस्त्मयावरील अतिक्रमण हटवून महापालिकेच्या वतीने हाॅकर्स झोन निश्चित करुन जागा उपलब्ध करून देण्याची जैस्वाल समाजाची भुमिका आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow