संविधानातील अधिकार आणि कर्तव्याच्या पालनाबरोबरच मूल्यांचा अंगीकार करावा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
संविधानातील अधिकार आणि कर्तव्याच्या पालनाबरोबरच मूल्यांचा अंगीकार करावा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सी...
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14 (डि-24 न्यूज)- भारतीय संविधानाने हक्काबरोबरच कर्तव्य दिली असून एक सुजाण नागरिक म्हणून
संविधानाच्या 'उद्देशिकेमध्ये' मुख्य मूल्यांचा उल्लेख आहे यातील, न्याय, स्वातंत्र्य ,समता,
बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्याचा अंगीकार करून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपनिवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड , निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, रोहयो उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे ,जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन, चरित्र आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असून त्यांनी समानतेचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला. एकात्मता, बंधुभाव या मूलभूत तत्वाच्या अंगीकार व्यक्तीने संविधानाच्या माध्यमातून करण्याबाबत मार्गदर्शन केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाची असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असल्याचे विधाते यांनी सांगितले.
What's Your Reaction?