मंगळवारी मार्कोनी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन...!

 0
मंगळवारी मार्कोनी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन...!

मंगळवारी मार्कोनी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - कारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांनी लिहिलेल्या "तोहफतुल हदीस" या पुस्तकाचे प्रकाशन 14 एप्रिल 2026, मंगळवारी सकाळी 11 वाजता भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मार्कोनी यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे सांगितले या पुस्तकाचे प्रकाशन मौलाना मोहम्मद नसीमोद्दीन मिफ्ताही यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मगदूम फारुकी तर प्रमुख अतिथी मौलाना सदरुल हसन नदवी, मौलाना डॉ.अब्दुल रशीद मदनी, आर्कीटेक्ट अर्शद अहमद, मेजर सय्यदा फरासत, डॉ.शाझिया नहरी, डॉ.अन्वरुल हक, सय्यद शाहिद हमीद, डॉ.इकबाल मिन्ने, डॉ.अजहर सिद्दीकी उपस्थित राहणार आहेत.

शहरात इल्मुल कुरान व हदीस अकॅडमीचे प्रमुख कारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांनी कुरानचे भाषांतर व हदीसचे शिक्षण देणे सुरू केले आहे.

"तोहफतुल हदीस " या पुस्तकाद्वारे समाजात मानवता, परस्पर सहानुभूती, शांतता, योग्य व्यवहार, इबादत, शेजा-यांचे हक्क, मत्सर व गैरसमज दूर करणे तसेच हलाल हरामची ओळख निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मार्कोनी यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow