कपटाचा अभाव म्हणजेच आर्जव - आर्यिका विकुंदनश्री माताजी

 0
कपटाचा अभाव म्हणजेच आर्जव - आर्यिका विकुंदनश्री माताजी

कपटाचा अभाव म्हणजेच आर्जव - आर्यिका विकुंदनश्री माताजी

छ. संभाजीनगर(औरंगाबाद ),दि.10(डि-24 न्यूज )- खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे दहा दिवसीय पर्युषण महापर्वाची आज तिस-या दिवशी उत्त्तम आर्जव या दिवशी आर्यिका विकुंदनश्री माताजी यांनी उदबोधन करतांना सांगीतले की, आर्जव म्हणजे रâजुता, सरळता जे मनात असेल तेच वचनात आणणे, तशीच कृती करणे, कपटाचा अभाव म्हणजेच आर्जव धर्म होय. मनुष्याचा वाकडेतिकडे चालण्याचा स्वभावच आहे, अशा वकृतेला काढण्यासाठी मृदुता, सरळता असणे आवश्यक आहे, ज्याचे मन सरळ असेल त्याच्याजवळ फारसे धन नसले तरी तो सुखा सामाधानाने जगतो, आपल्या मनात, वचनात व शरीरादी क्रियांमध्ये सरळता हवी, जो मनुष्य कुटील भाव, मायाचारी प्रवृती सोडून शुद्ध हृदयाने चारित्र्याचे पालन करतो तो स्वतःच्या घरातही सदाचरणाने राहतो, ही व्यक्ती समाजामध्ये सुद्धा निष्कलंक, निर्भयपणे, सन्मानाने आणि स्वाभीमानाने वावरते, अतिविनायने वागणारे नामधारी सज्जनच आजकल लोकांना कुटी ल भावनेने लुटण्याचे, लुबाडण्याचे काम करतात , पण असे कपट कारस्तान करून दुसर्‍याला फसविणारा व्यक्ती वास्तविक स्वतःलाच फसवीत असतो, एक दिवस त्याचे कपट उघडे पडतेच व शेवटी त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात, म्हणुन आपले विचार, वचन, आचरण अंतर बाह्य एक असावे त्याकरिता अत्यंत सरळ,सहज, निर्मळ बनन्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हास प्रेम, आदर सर्वाकडून मिळेल.

 सर्व प्रथम सकाळी आज भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. तदनंतर बोलीया प्रारंभ होउâन भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा मान अ‍ॅड.अनिल सौ.अलकादेवी कासलीवाल परिवार हिराकाका यांना मिळाला. तसेच शांतीमंत्राचा मान उर्मिलादेवी प्रमोदकुमारजी ठोले परिवार यांना मिळाला. तर भगवंताला अर्चनाफळ चढविण्याचा मान न्या.कैलासचंद,महावीर, विजय संतोष शैलेश चांदीवाल परिवार यांना मिळाला तर सर्व औषधीचा मान प्रकाशचंद,सचिन,डॉ.राहुल कासलीवाल यांना मिळाला. तदनंतर दुपारच्या सत्रात आर्यिका विकुंदनश्री माताजी यांच्या उपस्थितीत तत्वार्थसुत्र या ग्रंथाचे पठन करण्यात आले. तसेच संध्याकाळी ६.३० वाजता श्रावक प्रतिकमण व संगीतमय भगवंताची महाआरती करण्यात आली. संपुर्ण कार्यकम नमोकार भक्तीमंडळाच्या साग्रसंतामध्ये करण्यात आला. नवयुवक नवयुवती मंडळाच्या वतीने धार्मिक हौजी घेण्यात आली.तसेच सुमतीसागरजी पाठशाळेच्या वतीने मेहंंदी स्पर्धा घेण्यात आली.   

 संपुर्ण कार्यकम यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर विश्श्वस्थ मंडळ व पर्युषण पर्व समितीने परिश्रम घेतले असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow