नारेगावात कब्रस्तानासाठी काढला जनाजा मोर्चा, पोलिसांनी रोखला मोर्चा
नारेगावात जनाजा मोर्चा काढला, पोलिसांनी आश्वासन देत रोखला
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)
शहरातून जवळ नारेगावाचा विस्तार एवढा वाढला की 50 हजार पर्यंत लोकसंख्या वाढली. मुस्लिम कब्रस्तानातून रस्ता गेल्याने दफनविधी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने येथील रहिवासी जिल्हा प्रशासनाकडे मागिल चार वर्षांपासून कब्रस्तानासाठी जागेची मागणी करत आहे. तात्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहजतपूर येथील गट क्रमांक 26 मध्ये जागा देण्याचे आश्वासन दिले कारवाई सुरू झाली त्या जागेवर अतिक्रमण असल्याचे आढळून आले त्यानंतर कार्यवाही लाल फितीत अडकली. यासाठी भारत मुक्ती मोर्चा विविध आंदोलने करून पाठपुरावा करत आहे. आज दुपारी दोन वाजता नारेगाव ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाजा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनाजा मोर्चात सहभागी शेकडो नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिस निरीक्षक कल्याणकर यांनी मोर्चेकरांशी संवाद साधला. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी बोलणे करुन दिले. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मोर्चा काढता येणार नाही म्हणून येथेच रोखले व आपल्या मागणीसंदर्भात कार्यवाही आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ करण्यात येईल असे आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर येथेच मोर्चाची सांगता करण्यात आली.
जनाजा मोर्चात अॅड सुरेश कांबळे, जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा संतोष साळवे, शहर कार्याध्यक्ष अलियारखान, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मौलाना नईम कासमी, डॉ.रशिद मदनी, नंदुभाऊ खोतकर, अरुणकुमार लहुपंचांग, मौलाना अब्दुल सत्तार, नजीरोद्दीन फारुकी, शिरीष कांबळे, विश्वजित गोनाटकर, डॉ.राहुल सोनवणे, मिलिंद रंजन, मौलाना बशीर नदवी, मौलाना साजिद, मौलाना अबुजर, मौलाना हाफिज युसुफ व शेकडो रहीवाशी उपस्थित होते.
What's Your Reaction?