कमी वसुली करणारे वसूली लिपिक कर्मचाऱ्यांना शेवटची प्रशासकांची चेतावणी
कमी वसुली करणारे वसुली लिपिक कर्मचाऱ्यांना शेवटची चेतावणी...
वसुली वाढवली नाहीतर बडतर्फ करणार, प्रशासक...
छ.संभाजिनगर(औरंगाबाद), दि 10(डि-24 न्यूज)
कमी वसुली करणारे वसुली लिपिकांना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी त्यांचा कामात सुधारणा करण्याची शेवटची संधी दिली आहे जर का त्यांची वसुली कमीच राहिली तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रशासक जी श्रीकांत यांनी करवसुलीच्या आढावा घेतल्यानंतर कमी वासुलीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांचे असा निदर्शनास आले की बरेचशे वसुली लिपिक आणि कर्मचारी यांची वसुली निरंतर कमी आहे. ती वाढत नाहीये आणि त्यांनी जसा पाठपुरावा घेणे अपेक्षित आहे तसा घेत नाहीये.
प्रशासक महोदयांनी यावेळी सूचना केली की वसुली लिपिक यांनी जास्तीत जास्त थकबाकीदारांकडे पाठपुरावा करावा, नेमून दिलेल्या भागात फिरावे, थकबाकीदारांना फोन करावा त्यांना जाऊन भेटावे. जे कर भारत नाहीये त्यांची मालमत्ता सील करावी आणि थकबाकी पोटी जी मालमत्ता अगोदरच सील केलेली आहे अशी मालमत्ताचे लिलावाची प्रक्रिया सुरू करावी.
त्यांनी मालमत्ता सर्वेक्षण साठी नेमलेले कर्मचाऱ्यांना पण कामात सुधारणा करण्याची सूचना केली. यावेळी ते म्हणाले की सर्वेक्षण करणारे कर्मचाऱ्यांचा काम पण समाधानकारक नाही. त्यांनी जास्तीत जास्त मालमत्तांचे सर्वेक्षण दैनंदिन करावे आणि ते कर वसुली विभागाच्या निदर्शनास आणून द्यावे.
यावेळी प्रशासकांनी सूचना केली की ज्या कर्मचाऱ्यांचे वसुलीचे आकडे निरंतर कमी आहे त्यांनी ही शेवटची संधी समजून वसुली वाढावी अन्यथा त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात येईल.
What's Your Reaction?