हर्सुल, जटवाडा रोड परिसराला 10 दिवसात नळाला पाणी - मनपा आयुक्त अमोल येडगे
हर्सूल, जटवाडा रोड परिसराला 10 दिवसात नळाला पाणी - मनपा आयुक्त अमोल येडगे
1500 मिमी जलवाहिनी करणार कार्यान्वित...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)- सध्या शहरातील नवीन नळ कनेक्शन जोडनी सुरू आहे. जटवाडा रोड परिसर आणि हर्सुल येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे नळाला 10 दिवसात पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणा गतीने काम करत आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 1100 मिमी, 1500 मिमी आणि 2000 मिमी. व्यासाच्या तीन जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यातील 1500 मिमी. जलवाहिनीची स्वच्छता व क्रॉस कनेक्शनची कामे सुरू असून 10 दिवसात ही जलवाहिनी कार्यान्वित केली जाईल. या जलवाहिनीतून हर्सूल-जटवाडा परिसरात पाणी पोहोचणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
नवीन योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडी या सुमारे 39 किमी. लांबीची 2500 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. धरणात उभारलेल्या जॅकवेलमध्ये सायफन पद्धतीने पाणी घेऊन ते नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात आहे. सध्या या जलवाहिनीतून दररोज 40 mld एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातील 20 ते 25 mld पाणी शहराला पुरवठा होत आहे. नक्षत्रवाडी येथून शहरासाठी तीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. त्यापैकी 1500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीची स्वच्छता करून हायड्रोलिक चाचणी घेतली जाणार आहे. या जलवाहिनीवरून एन-5, एन-7 च्या जलकुंभाला क्रॉस कनेक्शन देण्यात आले आहे. जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हची चाचणी घेण्यात येणार आहे. या जलवाहिनीद्वारे शहरातील विविध ठिकाणच्या 9 जलकुंभांत पाणी पोहोचेल, व त्यातून 10 दिवसांनी पाणी पुरवठा सुरू केला जाईल. त्यानंतर 2 हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू केला जाईल, असे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
जायकवाडीच्या धरणातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी अॅप्रोच चॅनल तयार केले जात आहे. अॅप्रोच चॅनलचे काम सुरू करण्यासाठी JVPR कंत्राटदार कंपनीने मार्किंग केली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 448 मिटरपर्यंत अॅप्रोच चॅनलचे खोदकाम केले जाईल. त्यामुळे मृत जलसाठ्यातूनही पाणी उपसा करता येईल, असे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
What's Your Reaction?