गादीया विहारमध्ये ड्रेनिजच्या दुर्गंधीचा प्रश्न ऐरणीवर, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडून तातडीने दखल

 0
गादीया विहारमध्ये ड्रेनिजच्या दुर्गंधीचा प्रश्न ऐरणीवर, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडून तातडीने दखल

गादिया विहारमध्ये ड्रेनेजच्या दुर्गंधीचा प्रश्न ऐरणीवर; माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडून तातडीने दखल

ड्रेनेजच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त; रोगराई टाळण्यासाठी लाईनच्या तपासणीचे काम सुरू...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21 (डि-24 न्यूज) :- गादिया विहार परिसरातील ए-२ (A-2) इमारतीपासून मंदिराच्या मागील बाजूस जाणारी ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी चेंबरच्या वरून वाहत होते. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच दुर्गंधी आणि डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

या सार्वजनिक समस्येबाबत नागरिकांनी माजी महापौर तथा नगरसेवक श्री. त्र्यंबक तुपे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत तुपे यांनी संबंधित ड्रेनेज समस्येकडे तातडीने लक्ष दिले.

बुधवार, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सदर ड्रेनेज लाईनची पाहणी व तपासणीचे काम हाती घेण्यात आले. परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच संभाव्य रोगराईला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे, या सामाजिक भावनेतून या समस्येची दखल घेण्यात आली.

या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही सुरू केल्याबद्दल गादिया विहार परिसरातील समस्त रहिवासी व त्रस्त नागरिकांच्या वतीने माजी महापौर तथा नगरसेवक श्री. त्र्यंबक तुपे यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी दूर होऊन परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेपासून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गणपती मंदीराची रंगरंगोटी व सुशोभीकरण माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी केल्याने येथील रहिवाशांनी त्यांचा विशेष सत्कार करुन आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow