घरकुल योजना विकास मेळावा, कला दालन येथे पूर्णवेळ माहिती केंद्र...!

 0
घरकुल योजना विकास मेळावा, कला दालन येथे पूर्णवेळ माहिती केंद्र...!

महापालिकेच्या वतीने घरकुल योजना विकास मेळावा...

कला दालन येथे पूर्णवेळ माहिती केंद्र

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- आयुक्त श्री अमोल येडगे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला.

यामध्ये महापालिकेच्या वतीने दिनांक 27 मार्च रोजी लॉटरी सोडत काढण्यात आली होती. यातील लाभार्थ्यांना दिनांक 22 मे पर्यंत पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. या पैकी 130 नागरिकांनी पैसे भरले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना 22 मे पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यांनी विहित मुदतीत 10% रक्कम भरून सहकार्य करावे.

उर्वरित शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने लॉटरी पद्धत सुरू करण्यात आली आहे. या मध्ये आज पर्यंत 201 नागरिकांनी अर्ज भरले असून 151 नागरिकांनी 5000 रु.भरणा केलेला आहे. याची मुदत 18 मे रोजी संपत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नातील हक्काचे घर निश्चित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

महापालिकेच्या वतीने एकूण 05 ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. यापैकी आज पर्यंत हर्सूल येथील आवास योजनेत एकूण 350 नागरिकांनी अर्ज दाखल केले असून 12 नागरिकांनी 10% रक्कम भरणा केली आहे.

तसेच पडेगाव येथे 404 नागरिकांनी अर्ज दाखल केले. या पैकी 17 नागरिकांनी 10%पैसे भरले आहेत.

सुंदरवाडी 09 व 10 या अंतर्गत 1695 पैकी 68 नागरिकांनी पैसे भरले आहेत.

तिसगाव 225-1.605 पैकी 15 व तिसगाव 227-1 येथे 584 नागरिकांनी अर्ज दाखल केले असून 18 नागरिकांनी 10% रकमेचा भरणा केला आहे.

असे एकूण 3638 नागरिकांनी अर्ज दाखल केले असून 130 नागरिकांनी 10% रक्कम भरली आहे.

लाभार्थी ,बँक,विकासक व महापालिका आता एकाच छताखाली...

महापालिकेच्या वतीने आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लाभार्थी ,बँक, विकासक व महापालिका एकाच छताखाली येणार असून याची सुरुवात पडेगाव येथे दि.14 व 15 मे रोजी विजेत्या लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित करून होणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष लाभार्थी व बँक एकमेकांशी संवाद साधणार असून लाभार्थ्यांना सुलभ रीतीने कर्ज मिळवून देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व कारवाई केली जाणार आहे. यावेळी महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त व उप आयुक्त हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच हर्सूल येथे दि.16 व 17 मे रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

कला दालन येथे पूर्णवेळ माहिती कक्ष...

आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला दालन टाऊन हॉल येथे प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात पूर्णवेळ माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाला नागरिक रोज भेट देत आहेत. या कक्षाद्वारे नागरिकना आवश्यक ती कागदपत्रे व यासाठी सुलभ रीतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँक माहिती व मदत करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow