कुर्बानीसाठी बोकडे 550 ते 600 रुपये किलो दराने उपलब्ध...!
कुर्बानीसाठी बोकडे 550 ते 600 रुपये किलो दराने उपलब्ध...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- येत्या 28 मे रोजी देशभरात ईद-उल-अजहा (बकरी ईद) साजरी केली जाणार असून, या निमित्ताने शहरात कुर्बानीसाठी बकऱ्यांची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. ईदच्या तीन दिवसांत बकरा, बकरी, म्हैस, उंट, दुंबा जनावरांची कुर्बानी दिली जाते. महापालिका प्रशासनाकडूनही कुर्बानीसाठी आवश्यक ठिकाणे निश्चित करून सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर विविध जातींचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. जटवाडा रोडवरील हर्सूल तलावाजवळील न्यू आलमगीर कॉलनी येथे शेख कलीम मास्टर यांनी आपल्या गोट फार्मवर कुर्बानीसाठीचे बकरे 550 ते 600 रुपये किलो दराने विक्रीस ठेवले आहेत.
गरीबांनाही सहजपणे कुर्बानी करता यावी आणि त्यांच्यावर आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने किलोप्रमाणे दर ठेवण्यात आल्याचे शेख कलीम यांनी सांगितले. त्यांच्या फार्मवर कमी दरांपासून ते महागड्या बकऱ्यांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असून, 15 किलोपासून 50 किलो व त्यापेक्षा अधिक वजनाचे बकरे येथे मिळत आहेत.
खस्सी, सिरोही, कोठा, गावठी, बिटल, बरबरा तसेच गुजरी जातींचे बकरे विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती शेख कलीम मास्टर यांनी दिली.
What's Your Reaction?