घाटी रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी "आय जे मेडिकल हेल्पलाईन"सक्रीय...

 0
घाटी रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी "आय जे मेडिकल हेल्पलाईन"सक्रीय...

घाटी रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी ‘आय जे मेडिकल हेल्पलाइन’ सदैव तत्पर

इम्तियाज जलील यांच्या संकल्पनेतून उपक्रम; मराठवाड्यातील रुग्णांना मिळणार मदतीचा आधार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4 (डि-24 न्यूज) : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या संकल्पनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी ‘आय जे मेडिकल हेल्पलाइन’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

घाटी रुग्णालय हे मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल होत असतात. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच इतर बाबींबाबत माहिती मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो.

ही बाब लक्षात घेऊन ‘आय जे मेडिकल हेल्पलाइन’च्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रुग्णांना योग्य विभागापर्यंत पोहोचविणे, रुग्णालयातील प्रक्रियेबाबत माहिती देणे तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाइनचे सदस्य सातत्याने कार्यरत राहणार आहेत.

या रुग्णसेवा उपक्रमात जावेद खान, सय्यद समी, फसीयोद्दीन सिद्दीकी, शेख नईम, पुष्कर आहेरकर, विखार खान, मोहम्मद फेरोज आदी सदस्य सक्रियपणे सहभागी झाले.

‘रुग्णसेवा हीच खरी जनसेवा’ या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदत व मार्गदर्शन मिळणार आहे. रुग्णांच्या मदतीसाठी ‘आय जे मेडिकल हेल्पलाइन’ची टीम सदैव तत्पर राहणार असल्याचे जावेद खान पटेल यांनी सां

गितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow