छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का, डोणगावकरांची माघार, गणेश लोखंडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्याची नामुष्की...!
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का, डोणगावकरांची माघार, गणेश लोखंडे पुरस्कृत उमेदवार...?
डोणगावकरांची पक्षातून हकालपट्टी, ठाकरे गटाकडे प्लॅन बी तयार असल्याने लोखंडे मैदानात...!
समीरने माघार घेतल्यानंतर देवयानी डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतल्याने खळबळ...उबाठावर उमेदवार पुरस्कृत करण्याची नामुष्की...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार एड देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपला अर्ज वैयक्तिक कारणांमुळे मागे घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उबाठाचे अपक्ष उमेदवार गणेश लोखंडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्याची नामुष्की उबाठावर आली आहे. समीरने आपला अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यानंतर डोणगावकर यांनी माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. गणेश लोखंडे यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
What's Your Reaction?