नुतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी स्विकारला पदभार...!
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी.सी. यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास या सारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण काम करु असे त्यांनी यावेळी सांगितले.
मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून विनय गौडा जी.सी. यांनी आपला पदभार आज स्विकारला. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नूतन जिल्हाधिकारी गौडा यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिनगारे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नगरपालिका प्रशासन विभागाचे सह आयुक्त सौरभ जोशी, सहा. आयुक्त ऋषिकेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा यांनी मनोदय व्यक्त केला की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासाला चालना देतांनाच शिक्षण, आरोग्य, जीवनोन्नती उपक्रम, रोजगारभिमुखतेला चालना देणे अशा विविध क्षेत्रात काम करुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यास आपण प्राधान्य देऊ, असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
श्री. दिलीप स्वामी यांनी या जिल्ह्यात काम करतांना आलेले अनुभव हे सुखद होते असे सांगितले. निवडणूकांचा कालावधी मोठा असतांनाही मोठ्याप्रमाणावर विकासाची कामे मार्गी लावता आलीत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बाल विवाह प्रतिबंध, प्रसवपूर्वगर्भलिंग तपासणी या बाबींवरही काम केले. प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर आपण भर दिला, असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?