महापालिकेच्या 222 पदांच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर, संकेतस्थळावर भेट देण्याचे प्रशासनाचे आवाहन

 0
महापालिकेच्या 222 पदांच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर, संकेतस्थळावर भेट देण्याचे प्रशासनाचे आवाहन

महापालिकेच्या 222 पदांच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर

11 संवर्गांपैकी 5 पदांचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध; उर्वरित 6 पदांचा निकाल लवकरच होणार जाहीर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28 (डि-24 न्यूज) :- महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध 11 संवर्गांतील 222 पदांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेतील 5 पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित 6 पदांचा निकाल कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महानगरपालिकेच्या गट-क मधील विविध संवर्गातील 222 पदांची लेखी ऑनलाइन परीक्षा IBPS संस्थेमार्फत दि. 20 जून 2026 ते 9 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आली होती. यापैकी उपअग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक आणि अनुरेखक या पाच पदांचा निकाल IBPS संस्थेने महानगरपालिकेस सादर केला आहे. हा निकाल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

उर्वरित सहा पदांचा निकाल कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया

सदर पदांची परीक्षा घेण्यापासून निकाल तयार करून महानगरपालिकेस पाठविण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत करण्यात आली आहे. संस्थेकडून PDF स्वरूपात निकाल प्राप्त झाल्यानंतर तो महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतो.

ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात असून, यासंदर्भात कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच या भरती प्रक्रियेबाबत कोणी चुकीची माहिती देत असल्याचे किंवा कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाला द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी उमेदवारांना अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow