महीलांच्या सुरक्षेसाठी 24 तास परिश्रम घेणाऱ्या दामिनी पथकाचा केला सत्कार...!
महीलांच्या सुरक्षेसाठी 24 तास परिश्रम घेणाऱ्या दामिनी पथकाचा केला सत्कार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- महाविद्यालयीन तरुणी व महीलांची छेडछाड होवू नये यासाठी त्यांची सुरक्षा व जनजागृती करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या दामिनी पथकाचे अधिकारी व महीला पोलीस कर्मचाऱ्यांचा आज सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्ती अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक साजिद मौलाना यांच्या पुढाकाराने सत्कार व सन्मानाचा कार्यक्रम श्रीमती विना पाटनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी दामिनी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींची छेडछाड होवू नये, अत्याचार होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी व महाविद्यालय, शाळेत जाऊन जनजागृती केली जाते. कोणत्याही महीलेवर प्रसंग ओढवला तर दामिनी पथकाचा मोबाईल नंबर किंवा 112 क्रमांकावर संपर्क केला तर काही मिनिटांतच मदत केली जाते. जेष्ठ महीलांना कोणी रस्त्यावर सोडले तर त्यांना आश्रय देण्यासाठी प्रयत्न केले जातात. निराधार महिलांना रोजगारासाठी प्रयत्न केले जातात. या संघटनेच्या माध्यमातून आमचा सन्मान करुन शाबासकीची थाप दिल्याबद्दल दामिनी पथकाच्या माध्यमातून आभार मानते. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महीला शहराध्यक्ष मेराज पटेल यांनी मार्गदर्शन करताना दामिनी पथकाच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मुख्तार यांनी केले.
यावेळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन झाला सत्कार...
महीला पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे, समपोनि लता जाधव, मपोह निर्मला निंभोरे, अनिता शिंदे, कल्पना खरात, संगीता परळकर, सुधाकर पवार, रावसाहेब कोहकडे, बाळु वणे, सोनाली निकम, सिंधु वाडेकर, कल्पना नागरे, अयोध्या दौड, अनिता खैरे, अमृता भोपळे, पुजा जाधव, सुनीता नागलोद, मोनिका दिवे, अंबिका दारुंटे, साक्षी चंद्रे, सरीता कुंडारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
What's Your Reaction?