शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शाकेर खान...!

 0
शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शाकेर खान...!

शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शाकेर खान...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले. विरोधीपक्षनेते पद मिळाले. 3 स्विकृत सदस्यपदही पक्षाला मिळणार आहे. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे. आता शहराध्यक्ष कोण होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे या महत्त्वाच्या पदासाठी अनेक नेते व पदाधिकारी इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीत नवीन चेह-यांना पक्षाने संधी दिली आता शहराध्यक्ष पदावर नवीन चेहरा येईल अशी परिस्थिती दिसून येत आहे. यासाठी हैदराबाद येथे लाॅबिंग सुरू झाली आहे. या पदासाठी मागिल सहा वर्षांपासून पक्षात सक्रीय असलेले व पक्षाने जी जवाबदारी मिळाली ती यशस्वीपणे हाताळलेले शाकेर खान शर्यतीत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. 

त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची भेट घेऊन राजकारणात मागिल 1998 पासून सक्रीय व पक्षात कोणकोणत्या पदावर काम करण्याचा अनुभव आहे याची माहिती दिली. पक्षाचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी हे शहराध्यक्ष पदावर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.

शाकेर खान यांची राजकारणात वाटचाल कशी झाली सुरू यावर प्रकाश टाकला असता...

सन 1998-99 मध्ये काँग्रेसचे अल्तमश काॅलनीचे वार्ड अध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्द सुरू झाली. सन 2000 मध्ये महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून भाग्य आजमावले. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश व वार्ड अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. सन 2003 मध्ये राष्ट्रवादी शहर जिल्हा सचिव म्हणून बढती मिळाली. सन 2004 मध्ये शाकेर खान मित्र मंडळाची स्थापना करून राजकीय व सामाजिक कार्य सुरू केले. उच्चशिक्षित असल्याने राष्ट्रवादीने रहेमानिया काॅलनी वार्डातून 2005 मध्ये उमेदवारी दिली थोड्या मताने त्यांचा पराभव झाला. सन 2007 मध्ये जिल्हा महासचिव व वार्ड निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. सन 2010 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी पक्षाने अल्तमश काॅलनी वार्डातून मैदानात उतरवले. यावेळी फक्त 39 मतांनी पराभव झाला व नगरसेवक बनण्याची संधी हुकली. यानंतर पक्षाने शहागंज ब्लॉक अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. शांतता कमेटीवर नियुक्ती. सन 2011 मध्ये महाराष्ट्र बीपीएल मजदूर संघटना स्थापन करुन श्रमीकांसाठी काम केले. सन 2013 मध्ये ऑल इंडिया कौमी तंजीमचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. सन 2014 मध्ये राष्ट्रवादी शहर व जिल्हा महासचिव, पूर्व विधानसभा अध्यक्ष, सन 2016 मध्ये अल रहीम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष, सन 2019 मध्ये एमआयएम पक्षात लोकसभा निवडणूकीत काम केले. त्यानंतर खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. विधानसभा पूर्व व मध्य विधानसभा निवडणुकीत सक्रीय काम. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सक्रीय सहभाग. दोन वर्षे अकोला निरीक्षक म्हणून नियुक्ती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण निष्ठेने प्रचारात व संघटनेत काम केले. आता औरंगाबाद शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow