सिडको पोलीस एक्शन मोडमध्ये, 4 पिस्तूल, 11 काडतूस जप्त, 6 आरोपी अटक

 0
सिडको पोलीस एक्शन मोडमध्ये, 4 पिस्तूल, 11 काडतूस जप्त, 6 आरोपी अटक

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; सहा आरोपींकडून चार पिस्तूल आणि 11 जिवंत राऊंड जप्त

2 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी... सिडकोत भरदिवसा बंटी दिक्षीतची हत्या झाल्यानंतर शहर पोलिस एक्शन मोडमध्ये आली आहे आता गुन्हेगारी करणाऱ्यांची आता खैर नाही अशी चर्चा या कारवाईनंतर सुरू झाली आहे... शहरातून गुंडागर्दी नष्ट व्हावी अशी शहरवासीयांची मागणी आहे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 (डी-24 न्यूज) : सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत सहा आरोपींकडून एकूण चार देशी बनावटीची लोखंडी पिस्तुले आणि 11 जिवंत राऊंड जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 22 हजार रुपये आहे. ही कारवाई 24 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आली.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले (परिमंडळ-२) आणि सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर (सिडको विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई

सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवा अंबादास सुरे (वय 25, रा. सुरेवाडी गल्ली क्रमांक 4, हनुमान मंदिराजवळ, जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर) याच्याकडे पिस्तूल व राऊंड आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवा सुरे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने त्याच्याकडील पिस्तूल त्याचा मित्र सुमीत सुनील विसपुते (रा. सुरेवाडी गल्ली क्रमांक याच्या घरी ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सुमीत विसपुते याच्या घराची झडती घेतली असता, एका लोखंडी टाकीतून एक लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले.

शिवा सुरे याच्याकडे मिळालेल्या पिस्तुलाबाबत चौकशी केली असता, त्याने सत्यभान भास्कर चाटे (रा. मयूरपार्क) आणि अर्जुन किशोर लिंगायत (रा. नवजीवन कॉलनी, एन-11, सिडको) यांच्याकडून पिस्तूल घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी पुढील तपास करून सत्यभान चाटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले.

तसेच, सत्यभान चाटे याचा साथीदार अर्जुन लिंगायत याच्याकडे असलेली दोन पिस्तुले जाधववाडी परिसरात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता, दोन लोखंडी पिस्तुले मिळून आली.

या प्रकरणातील पुढील तपासात सत्यभान चाटे आणि अर्जुन लिंगायत यांचे साथीदार श्रीकांत सतीश शिखरे (रा. मयूरपार्क) आणि विशाल राज भोसले (रा. एस.टी. कॉलनी, रामेश्वर महादेव मंदिराजवळ, जाधववाडी) यांच्याकडेही पिस्तुलांचे जिवंत राऊंड असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन श्रीकांत शिखरे याच्याकडून पाच जिवंत राऊंड, तर विशाल भोसले याच्याकडून चार जिवंत राऊंड जप्त केले.

अशा प्रकारे पोलिसांनी सहा आरोपींकडून एकूण चार पिस्तुले आणि 11 जिवंत राऊंड असा 2 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

6 आरोपींची नावे...

शिवा अंबादास सुरे, वय 25 वर्षे, व्यवसाय कंत्राटदार(शिक्षण बीएससी), रा. सुरेवाडी गल्ली क्रमांक 4, हनुमान मंदिराजवळ, जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर.

सुमीत सुनील विसपुते, धंदा(शिक्षण bsc Informatics mgm college) खाजगी नोकरी, रा. सुरेवाडी गल्ली क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर.

सत्यम भास्कर चाटे, वय 23 वर्षे, व्यवसाय शिक्षण बीएससी तिसरे वर्ष राजमाता जिजाऊ काॅलेज, खुलताबाद; रा. दादोजी कोंडदेव, शाळेजवळ, मयूरपार्क, छत्रपती संभाजीनगर.

अर्जुन किशोर लिंगायत, वय 20 वर्षे, व्यवसाय शिक्षण, बी.सी.एस. तृतीय वर्ष, राजीव गांधी सायन्स कॉलेज, मिटमिटा; रा. नवजीवन कॉलनी, एन-11, सिडको, छत्रपती संभाजीनगर.

श्रीकांत सतीश शिखरे, वय 24 वर्षे, व्यवसाय बीएससी नालंद मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट रा. प्लॉट क्रमांक 5, तुळजाभवानी चौकाजवळ, विशाल लॉन्ड्रीजवळ, मयूरपार्क, छत्रपती संभाजीनगर.

विशाल राज भोसले, वय 24 वर्षे, शिक्षण 12 वी उत्तीर्ण, रा. एस.टी. कॉलनी, रामेश्वर महादेव मंदिराजवळ, जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर.

आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. शिवा सुरे याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 537/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद आहे.

श्रीकांत शिखरे याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाणे, जिन्सी पोलीस ठाणे तसेच मुंबईतील पार्कसाइट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची नोंद कागदपत्रांत आहे. विशाल भोसले याच्याविरुद्धही सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 232/2023 अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे नमूद आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. पथकात खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

अतुल येरमे — वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सिडको.

अनिल नाणेकर — पोलीस उपनिरीक्षक, सिडको पोलीस ठाणे.

मंगेश पवार — पोलीस अंमलदार.

सहदेव सावळे — पोलीस अंमलदार.

अमोल अंभोरे — पोलीस अंमलदार.

नरेश भांडे — पोलीस अंमलदार.

अतुल सोळंके — पोलीस अंमलदार.

या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल अंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow