ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त घाटी रुग्णालयात फळे वाटप...
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त घाटी रुग्णालयात फळ वाटप
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 26 (डि-24 न्यूज) :- ईद-ए-मिलादुन्नबीचा सण शहरात शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सणानिमित्त शहरातील विविध भागांत सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार हाजी सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार AIMIM औरंगाबाद जिल्हा टीमच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त घाटी रुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून प्रेम, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करून ईद-ए-मिलादुन्नबीचा सण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्यात आला.
यावेळी औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष जावेद पटेल, जिल्हा महासचिव शेख कलीम, जिल्हा सचिव पवन गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजू पटेल, माजी महिला शहर कार्याध्यक्ष अंकिता बाळू गजहास, रफीक पटेल, फेरोज खान, वसीम सिद्दीकी, साजेद खान, खालेद चाऊस, रेहान शेख, अल्ताफ शेख, वसीम शेख, इलियास शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
AIMIM औरंगाबाद जिल्हा टीमच्या या उपक्रमाचे घाटी रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कौतुक
केले.
What's Your Reaction?