पहिल्या दिवशी 19 इच्छूकांनी घेतले 30 नामनिर्देशन पत्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

 0
पहिल्या दिवशी 19 इच्छूकांनी घेतले 30 नामनिर्देशन पत्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

पहिल्या दिवशी 19 इच्छुकांनी घेतले 30 नामनिर्देशन पत्र ; एकाही उमेदवाराचे नामनिर्देशन दाखल नाही

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 साठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 19 इच्छुक अर्जदारांनी एकूण 30 नमूना नामनिर्देशन पत्र घेतले आहेत. मात्र, आज एकाही उमेदवाराकडून नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही.

निवडणुकीची अधिसूचना आज विभागांतर्गत सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद/नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच शासकीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर तसेच स्थानिक वर्तमानपत्रांमध्येही सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार 6 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, 7 ऑक्टोबर अर्जांची छाननी, तर 9 ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार असून, 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow