वक्फ संपत्ती मुस्लिमांची आहे तुमची जहागिर नाही, इम्तियाज जलील भडकले...!

 0
वक्फ संपत्ती मुस्लिमांची आहे तुमची जहागिर नाही, इम्तियाज जलील भडकले...!

वक्फ संपत्ती मुस्लिमांची आहे तुमची जहागिर नाही - इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) उद्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर वक्फ संशोधन विधेयक - 2024 सादर केले जाणार आहे. देशाचे लक्ष या विधेयकाकडे लागले आहे पास होते किंवा नाही. मुस्लिम समाजाचा या विधेयकाला विरोध आहे. देशभरात वक्फ विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या विवादीत विधेयकावर माजी खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. वक्फ संपत्ती हि मुस्लिम समाजाची आहे तुमची जहागिर नाही. तुमच्या पध्दतीने हा निर्णय घ्यायचा होता तर जाॅईंट पार्लमेंटरी कमेटी तयार का केली असा सवालही त्यांनी सरकारला विचारले आहे. 

जाॅईंट पार्लमेंटरी कमेटीत पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. जाॅईंट पार्लमेंटरी कमेटीने आपला रिपोर्ट संसदेसमोर सादर केला आहे त्यापूर्वीच सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. जे निर्णय समितीने घेतला तो रद्द करण्यात आला आहे. जर तुम्हाला समीतीचा निर्णय मान्यच नव्हते तर हे नाटक कशासाठी केले. लोकांचा पैसा वेळ वाया घालवला. तर ईतर धर्माच्या बोर्डामध्ये आमचे लोक टाका असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले सरकारकडे आकडे आहेत आणि म्हणूनच वक्फ बोर्डाच्या या बीलाला नितिश कुमार, चंद्रबाबू नायडू, चिराग पासवान, अजित पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. आम्ही या विधेयकाला विरोध केला आहे. या विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जावू त्यांनी बरोबर आहे सांगितले तर मान्य करु. न्याय प्रणालीवर आमचा विश्वास आहे. वक्फ बोर्डाची मालमत्ता मुस्लिमांनी दान केलेली संपत्ती आहे. वक्फ बोर्डात तुमचे लोक येत असतील तर इतर जाती धर्माच्या बोर्डात आमचे लोक टाका अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow