आम्ही नेहमी वक्फ बोर्डाची जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न केला सरकार अडाणी अंबानी यांना हा जमीन देण्यासाठी खटाटोप - चंद्रकांत खैरे

 0
आम्ही नेहमी वक्फ बोर्डाची जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न केला सरकार अडाणी अंबानी यांना हा जमीन देण्यासाठी खटाटोप - चंद्रकांत खैरे

आम्ही नेहमी वक्फ बोर्डाची जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न केला सरकार अडाणी अंबानी यांना हि जमीन देण्यासाठी बील - चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात शिवसेनेचे खासदार मतदान करणार आहे. चार वाजेनंतर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. वक्फ संशोधन बील वक्फ संपत्ती हडप करण्यासाठी सरकारने आणला आहे. हि जमीन अडाणी अंबानी यांच्या घशात घालण्याचा घाट सरकारचा आहे असा घणाघात पत्रकार परिषदेत शिवसेना(उबाठा)चे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

त्यांनी पुढे सांगितले मी खासदार असताना वक्फ जाॅईंट पार्लमेंटरी कमेटीचा चेअरमन होतो तेव्हा कमिटीला शहरात आणले होते. मराठवाड्यात 55 हजार एकर वक्फची संपत्ती आहे ती संपत्ती बील मंजूर करुन हडप करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी लावला. वक्फची संपत्ती वाचवण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेना विरोधात आहे. या विधेयकाचा विरोध करणार आहे. हे विधेयक मुस्लिम समाजावर अन्याय करणारा आहे. हिंदू समाजाला सत्ताधारी आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हे दाखवण्यासाठी हिंदूत्वाचे राजकारणात करण्याचे काम सुरू आहे. वक्फची संपत्ती ज्यांनी हडप केली त्याचे परिणाम वाईट झालेले आहे हा आजपर्यंतचा इतिहास आहे. वक्फ म्हणजे दान केलेली जमीन आणि या जमिनीवर डोळा ठेवण्याचे पाप हे सरकार करत असल्याने हे पाप त्यांना फेडावे लागतील अशी टिका खैरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राजु शिंदे यांनी शिवसेना सोडली व राजीनामा दिला या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले राजु शिंदे हे ब्लॅकमेलर आहे चिकलठाण्यात जावून विचारा असे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow