बाबा बागेश्वर यांच्या विरोधात काँग्रेस अक्रामक, क्रांती चौकात जाळले पोस्टर...!
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बाबा बागेश्वर विरोधात शहर व जिल्हा काँग्रेस तर्फे जोरदार जोडेमारो आंदोलन....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले. भोंदू व विकृत बागेश्वर बाबाच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आज शहरातील क्रांती चौक येथे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी बाबा बागेश्वर यांचे पोस्टर जाळून वक्तव्याचा निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराज समजण्या एवढी लायकी बागेश्वर भोंदूची नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे या भोंदू बाबाचे बोलविते धनी आहेत. तिघांनी या प्रकरणी माफी मागितली पाहिजे. तसेच बागेश्वर या भोंदू बाबावर त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे असे मत यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी व्यक्त केले.
यावेळी भोंदू बाबा बागेश्वर बाबा हाय हाय, होश में आओ होश मे आओ - भाजप सरकार होश में आओ, अशा जोरदार घोषणा देऊन क्रांती चौक परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, ब्लॉक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, अनिस पटेल, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, इंजिनिअर इफ्तेखार शेख, मोईन इनामदार, गंगापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड, विश्वास औताडे, सरचिटणीस राहुल सावंत, असदउल्ला शकील, इंजि. इफ्तिकार शेख, डॉ. सिकंदर शेख, योगेश थोरात, दिलीप भोसले, संजय धर्मरक्षक, रेखा वाहतुळे, गौरव जैस्वाल, बाबासाहेब पवार, इरफान पठाण, शेख फय्याजोद्दीन, प्रकाश सानप, कल्याण चव्हाण, पप्पूराज ठूबे, सलीम इनामदार, सलमान खान, रमेश काळे, अजय डिडोरे, शिरीष चव्हाण, शुभम साळवे आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?