बुलडाणा जिल्ह्याच्या प्रभारीपदी शेख युसूफ...!

 0
बुलडाणा जिल्ह्याच्या प्रभारीपदी शेख युसूफ...!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्याच्या प्रभारीपदी शेख युसुफ यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रभारीपदी छत्रपती संभाजीनगर येथील काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष शेख युसुफ यांचेकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहेत.

शेख युसुफ हे विद्यार्थी संघटनेपासून काँग्रेस पक्षामध्ये अग्रेसिव्ह कार्यरत आहेत ते विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष व युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस राहिलेले आहेत तसेच नुकतेच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चार वर्ष त्या पदावर काम केलेले आहेत. अनेक वर्षाचा संघटना वाढवण्यासाठी शेख युसूफ यांच्याकडे अनुभव आहेत सर्वच इस्तरावरून जिल्ह्यातून काँग्रेसचे पदाधिकारी त्यांचे स्वागत करीत आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 26 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे. हे पत्र बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील अवचार यांना पाठविण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow