मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाईने शहराचे राजकारण तापले, 3 मालमत्ता 2 तासात जमीनदोस्त...!
मतीन पटेल यांच्या 3 मालमत्तांवर मनपाचा बुलडोझर...
निदा खानला आश्रय दिल्याने कुटुंब आले रस्त्यावर, आश्रय देने भोवले, भाजप-एमआयएम आमनेसामने... अलिशान घर बणवून देणार मतीनच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे इम्तियाज जलिल यांचे आश्वासन... कुटुंबाने अतिक्रमण पाडणारे अधिका-यांना संविधान व हार देवून स्वागत केले, हि कारवाई बेकायदेशीर व दादागिरी करून करण्यात आली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- नाशिक येथील टिसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचे नारेगाव प्रभागातील नगरसेवक मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. पटेल याचे नारेगाव मुख्य रस्त्यावरील राहते घर, संपर्क कार्यालय व निदा खानला आश्रय दिलेले घर अशा 3 मालमत्ता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी सकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान कारवाई करत जमीनदोस्त केल्या.
या कार्यवाईत मनपाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. लोक झोपेतून उठण्याच्या आत हि कारवाई करण्यात आली. समर्थकांना विरोध करण्यासही वेळ मिळाला नाही. 150 पोलिस अधिकारी कर्मचारी, 10 जेसीबी, 120 मनपाचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी हि कारवाई यशस्वी केली. समाधानकारक कागदपत्रे सादर न केल्याने व न्यायालयात स्टे मिळाला नसल्याने हि कारवाई करण्यात आली असल्याचा माहिती अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी यावेळी दिली.
उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकत महापालिकेनेही गुन्हेगारांच्या मालमत्तेवर बुलडोजर चालविला. या कारवाईने महापालिकेत आता भाजप विरुद्ध एमआयएम असा संघर्ष पेटला असून, सत्ताधारी नगरसेवकांच्या अतिक्रमणांवरही कारवाईची मागणी जोर धरत आहे. शहरात अनेक बांधकामे अवैध आहे. मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालला तो आरोपी आहे त्याचे समर्थन करणार नाही परंतु कुटुंब रस्त्यावर आला आहे त्यांचा काय दोष आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी अतिक्रमण केले आहे त्यांच्याही मालमत्ता कधी पाडणार. उत्तर प्रदेशशची बुलडोझर संस्कृती महाराष्ट्रात येवू देणार नाही. मुंबईत तर मंत्र्यांचे बंगले अवैध बांधकाम झालेले आहे. भाजपचे नेते खेडकर यांनी तर वरचे मजले परवानगी न घेता बांधले अशी टिका उबाठाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी भाजपावर केली.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. ह्या मालमत्ता पाडण्याची महापालिकेला एवढी घाई झाली होती की या मालमत्ता देशासाठी नुकसान देणारी आहे. सत्तेचा दुरुपयोग भाजपा करत आहे. भाजपा व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकाम केलेले आहे त्यांना अभय दिला जात आहे. अतिक्रमण विभागाकडे याची माहिती आहे. आम्ही हे पुरावे मनपा आयुक्त यांच्याकडे देवून कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
नगरसेवक मतीन पटेलविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या मालमत्तांचा शोध महापालिकेने घेतला असता, नारेगाव भागात राहते घर, घराजवळच कार्यालय आणि निदा खानला ज्या घरातून ताब्यात घेतले, ते घरही अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. या 3 मालमत्तांची बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र आदी सादर करण्याची सूचना देणारी नोटीस महापालिकेने दिली होती. त्यासाठी तिन्ही मालमत्तांसाठी कागदपत्रे सादर करण्यास 3 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही नोटिस संबंधित मालमत्तांवर चिटकावण्यात आल्या होत्या. दरम्यान, पटेलच्या वतीने खुलासा सादर करत, 15 दिवसांची मुदत देण्याची मागणी करण्यात आली, तसेच न्यायालयातही त्याने धाव घेतली होती. न्यायालयाचे निर्णय आला नाही तर पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार होती त्याअगोदर हि कारवाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा 24 तासांची मुदत देणारी नोटिस बजावण्यात आली. न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली नाही, त्यामुळे कारवाईचा मार्ग मोकळा होताच, मंगळवारी रात्रीच नियोजन करण्यात आले. बुधवारी पहाटे 5 वाजता अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता कुलकर्णी, संजय सुरडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा नारेगावात दाखल झाला. त्यानंतर 6 वाजेच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली. दोन तासात कारवाई पूर्ण करण्यात आली. कुटुंबाने कारवाईला विरोध न करता हातात फुलांचे हार घेऊन स्वागत करण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या हातात मतीन पटेल यांच्या पत्नी व चिमुकली मुलीने फुलांचे हार व संविधान दिले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी प्रत्यक्षदर्शी यांनी महापालिकेवर बेकायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला.
नारेगावात कारवाई करताना, मोठा विरोध होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांना होता, मात्र कारवाईला विरोध झाला नाही, उलट मतीन पटेलच्या पत्नीने अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह अधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्याचा प्रयत्न केला. वाहुळे यांनी तो नम्रपणे नाकारला. त्यानंतर सहा वर्षाच्या त्याच्या मुलीने संविधानाची प्रत देऊन शहरात सर्वच ठिकाणी अशाच प्रकारे कारवाई करावी, अशी अपेक्षा कुटुंबियांनी व्यक्त केली.
मतीन पटेल याचे नारेगावच्या मुख्य रस्त्यावर सुमारे 2400 चौ. फुटाचे राहते घर होते. याठिकाणी 6 दुकाने व 8 ते 10 खोल्या होत्या. घराला लागूनच 30 बाय 20 आकाराचे जागेवर पत्र्याचे शेड उभारून कार्यालय थाटलेले होते. कौसर पार्क येथे 20 बाय 30 आकाराच्या प्लॉटवर दोन मजली घर होते. याच घरात आरोपी निदा खान सुमारे दीड महिना आश्रयाला होती. हे घर पटेल याने काही महिन्यापूर्वीच विकत घेतले होते. या तीनही मालमत्ता महापालिकेची परवानगी न घेता बांधण्यात आल्या होत्या.
अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने पटेल यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या. दिलेल्या मुदतीत त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. त्यानंतर 24 तासांची मुदत देणारी आणखी तीन नोटिसा देण्यात आल्या. नोटिसची मुदत संपल्यानंतर आज कारवाई केली. अनधिकृत मालमत्तांप्रकरणी इतरांनाही कायदेशीर प्रक्रिया राबवून नोटिस बजावून खुलासा मागविण्यात येईल., खुलासा समाधानकारक नसेल तर निश्चित त्यांच्यावरही याच पद्धतीने कारवाई केली जाईल अशी माहिती संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग यांनी दि
ली आहे.
What's Your Reaction?