जिवंत असलेल्या ट्रस्टीला मयत दाखवून चेंज रिपोर्ट दाखल, वक्फ बोर्डाच्या वतीने आतापर्यंत कारवाई नाही...!

 0
जिवंत असलेल्या ट्रस्टीला मयत दाखवून चेंज रिपोर्ट दाखल, वक्फ बोर्डाच्या वतीने आतापर्यंत कारवाई नाही...!

जिवंत असलेल्या ट्रस्टीला मयत दाखवून चेंज रिपोर्ट दाखल, वक्फ बोर्डाच्या वतीने आतापर्यंत कारवाई नाही...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) पुणे रेल्वेस्टेशन मस्जिदचे ट्रस्टी जीवंत असताना चेंज रिपोर्टमध्ये मयत दाखवून वक्फ बोर्डाची दिशाभूल केली तरीही वक्फ बोर्डाच्या वतीने आतापर्यंत कारवाई केली नाही. हे प्रकरण 12/12/2022 चे आहे. तहरीके औकाफच्या वतीने लेखी तक्रार केली पाठपुरावा केला तरीही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आज शहरातील हज हाऊस येथे वक्फ बोर्डाची बैठक होती यामध्ये 58 मागणीचे निवेदन चेअरमन समीर काझी यांना देण्यात आले. या संदर्भात एका महीन्यात कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यानंतर कारवाई झाली नाही तर वक्फ बोर्डाचे चेअरमन व सदस्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा तहरीके औकाफचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

पुणे रेल्वेस्टेशन मस्जिदचे तथा मदरसा दारुल उलूम मोहंंमदीया पुणे ट्रस्टचे सेक्रेटरी सिराज इलाही शेख हे कामकाज बघतात. हि फार जुनी ट्रस्ट आहे यामधील सहा सदस्यांचे मृत्यू झाले आहे नवीन सदस्यांनी चेंज रिपोर्ट दाखल करताना सात सदस्य मयत दाखवले. एका प्रकरणात सर्व माहिती असूनही जाणूनबुजून स्किम मंजूर करण्यात आली तर दुस-या प्रकरणात नावांमध्ये तफावत असल्याने स्किम नामंजूर झाले. या प्रकरणाची माहिती असताना कारवाई न करणारे वक्फ अधिका-यावर तातडीने चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत शब्बीर अन्सारी यांनी केली आहे. त्यांनी वक्फ बोर्डात भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप केला व दिलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी स्वतः पुणे रेल्वेस्टेशन मस्जिदचे ट्रस्टी सिराज इलाही शेख, सय्यद शकील, अब्दुल कय्यूम नदवी, मोईन इनामदार यांची उपस्थिती हो

ती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow