खाजगी यंत्रणेला सरकारी शाळा चालविण्यासाठी देऊ नये, हजारो शिक्षक रस्त्यावर

खाजगी यंत्रणेला सरकारी शाळा चालविण्यासाठी देऊ नये, हजारो शिक्षक रस्त्यावर
पाटोदा आदर्श ग्रामपंचायत बनवणारे भास्करराव पेरे पाटील यांचे झाले कडक भाषण
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) आज गांधी जयंती साजरी होत असताना शहरात हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन सरकारी शाळा चालविण्यासाठी खाजगी यंत्रणेला देऊ नये, नोक-यांचे खाजगीकरण व शिक्षकांच्या विविध मागणीसाठी क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महा आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे शिक्षक असे 22 संघटनांनी सहभाग घेतला.
पाटोदा ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत बनवणारे भास्करराव पेरे पाटील यांनी मोर्चात कडक भाषण करत कोणत्याही परिस्थितीत सरकारी शाळा चालविण्यासाठी दिले जाणार नाही यासाठी तीव्र विरोध केला पाहिजे. आपल्या भाषणात त्यांनी सरकारवर कडक शब्दात टिका करत हा जी आर मागे घेण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी मार्फत आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे, मुख्यालयी वास्तव्य, शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्यासाठीची अट रद्द करावी, वेगवेगळ्या अॅप व अनेक प्रकारच्या ऑनलाईन माहिती, सरकारी शाळा खाजगी यंत्रणेला चालवण्यास न देने, नोक-यांचे खाजगीकरण करु नये, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध 28 मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे, जिल्हा सरचिटणीस कैलास गायकवाड, मधुकरराव वालतूरे, प्रशांत हिवरडे, बाबासाहेब जाधव, संजय भुमे, राजेश पवार, अॅड अभय टाकसाळ आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






