14 डिसेंबर पासून सरकारी कर्मचारी पुन्हा जाणार बेमुदत संपावर...?
जूनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक,
14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार-विश्वास काटकर
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) जून्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी मार्च 2023 मध्ये झालेल्या संपानंतर राज्यशासनाने सकारात्मक विचार केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर या मागण्यांबाबत राज्य शासन काही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केला आहे. जून्या पेन्शनच्या मागणी 14 डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समन्वय समितीचे सरटिचणीस विश्वास काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ही अंतीम लढाई राहणार असल्याचेही काटकर यांनी सांगितले.
बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. काटकर पुढे म्हणाले, जून्या पेन्शनच्या मागणीसाठी मार्चमध्ये 7 दिवसांचा बेमुदत संप पुकारला होता. या संपाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्य शासनाने जूनी पेन्शन लागू करण्याचे धोरण मान्य असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. यावर लवकरच सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाने सुबोधकुमार यांची समिती स्थापन केली. मात्र 6 महिने उलटून गेले तरी याबाबत राज्य शासन काही हालचाली करत नसल्याने संघटनेने पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. अभिवचनाकडे लक्ष वेधण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी कुटुंबियांसह मोर्चा काढला होता. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलविले होते. परंतु या बैठकीत काहीही झाले नाही. पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चेला बोलावतील असे वाटले होते. परंतु तसे काही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे राज्य शासन मागण्यांबाबत चालढकल करत असल्याचा आरोप काटकर यांनी केला आहे. जूनी पेन्शनच्या मागणीसाठी संघटनाने अंतीम संघर्ष करण्याची भूमिका घेतली असून 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे काटकर यांनी सांगितले. यावेळचे आंदोलन निर्णायक राहणार असल्याचेही काटकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे, राज्य उपाध्यक्ष डॉ. देविदास जरारे, संजय म्हाळणकर, सुरेश तरपे, एन.एस.कांबळे, वैजनाथ विभुतेकर, देविदास तुळजापूरकर यांनी उपस्थिती होती.
What's Your Reaction?